युतीच्या सरकारला पाठिंबा देऊन आम्हाला आशीर्वाद द्या…; Friendship Day निमित्त शंभूराज देसाईंचं ठाकरेंना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. यावर्षी 07 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे आला असल्यामुळे मैत्रीचा हा खास दिवस साजरा होत आहे. या मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे बंडखोर आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. शिवसेना व भाजपचे नैसर्गिक युतीचे सरकार महाराष्ट्रात आलेले आहे. या सरकारला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी शुभेच्छा द्याव्यात आणि युतीच्या सरकारला पाठींबा देऊन आम्हाला आशीर्वाद द्यावा,” असे देसाईंनी म्हंटले.

मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे बंडखोर आ. देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मैत्री दिनानिमित्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार घेऊन पुढे जाण्याची भूमिका विधिमंडळातील आमच्या अनेक सहकाऱ्यांनी व शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेतली आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/577654627323261/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C-GK2C&ref=sharing

 

शिवसेना व भाजप पक्ष हि जी पारंपारिक युती आहे. जी नैसर्गिक युती आहे जी स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी साहेब, प्रमोद महाजन साहेब आणि स्वर्गीय हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलेली आहे. तीच युती हि पुढे चालू ठेवण्याचे काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 40 आमदार, 12 खासदार आणि अनेक जिल्हाप्रमुखांनी स्वीकारली. यामुळे आता सर्वसामान्य शिवसैनिक कोणाबरोबर आहेत. त्यांनीही आमची भूमिका स्वीकारली आहे, असे देसाई यांनी म्हंटले.