पाटण मतदार संघातून निवडणूक लढवून दाखवावी : शंभूराज देसाईंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
आदित्य ठाकरे गेले 6 महिने काहीच बोलत नव्हते. मात्र, आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री यांच्यावर बोलायला लागले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत वरळीतुन उभं राहण्याचं आव्हान दिल आहे. मात्र, माझं आदित्य ठाकरे यांनी माझ्या पाटण मतदारसंघात उभं राहुन दाखवावं, असं आव्हान शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना दिल आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले होते. त्यावर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी ते पुढे म्हणाले, आदित्या ठाकरेंना स्वतः ला आमदार होण्यासाठी वरळीतल्या दोन आमदारांच तिकीट कापुन विधानपरिषदेची आमदारकी द्यावी लागली. एका आदित्य ठाकरेंना निवडुन आणण्यासाठी त्यांना दोन आमदारकी द्यावी लागली, ही ज्यांची वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान देणं, हे हास्यास्पद आहे.

शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना आव्हान दिल्याने आता चांगलेच राजकारण तापलेले आहे. पाटण मतदार संघातून किंवा ठाकरे गटाकडून अद्याप मंत्री देसाई यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किंवा इतर कोण या वक्तव्याचा समाचार घेणार की नेहमीप्रमाणे शांतता बाळगणार हे पहायला मिळणार.