शंभूराज देसाई यांनी 45 वर्षानंतर मारली बाजी पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सत्तांतर.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | शिंदे गटाचे नेते आणि सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण कृषी उत्पन्न बाजारसमितीवर आघाडी घेतली आहे. देसाई यांच्या गटाने ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा २२५ मतांच्या फरकाने जिंकत विजय प्राप्त केला आहे. जोतीराम काळे, समीर भोसले, सिद्धार्थ गायकवाड आणि सुधाकर देसाई हे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना मोठा झटका बसला आहे. हॅलो महाराष्ट्र आपल्यापर्यंत ब्रेकिंग बातम्या पोहोचवण्यासाठी तत्पर असून हि बातमी सातत्याने अपडेट केली जात आहे. तेव्हा निकालाचे सविस्तर वृत्त पाहण्यासाठी हि बातमी रिफ्रेश करा.

पाटण कृषी बाजार समिती निकाल नुकताच हाती आला आहे. पाटण बाजारसमितीवर शंभूराज देसाई यांनी 45 वर्षानंतर बाजी मारली असून यामुळे पाटणकर यांना धक्का बसला आहे. पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तांतर झाले असून सविस्तर आकडेवारी थोड्याचवेळात येथे अपडेट करण्यात येईल. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रदीर्घ काळाने सत्ता मिळवली आहे.

पाटण शेती उत्पन्न बाजारसमितीत शिंदे गट शिवसेनेला 15 जागा प्राप्त झाल्या आहेत तर राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी झाली आहे. विजयी उमेदवारांची सविस्तर यादी काही मिनिटांमध्ये येथे अपडेट करण्यात येईल तेव्हा ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडलेले रहा.

कराड बाजारसमितीचे रोजचे बाजारभाव तुम्हाला मोबाईलवर कसे मिळतील?

शेतकरी मित्रांनो आता आपल्याला कराड बाजारसमितीमधील रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवता येणार आहेत. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. या अँपवर आपल्याला कराड बाजारसमितीमधील रोजचे बाजारभाव घरी बसून पाहता येतात. यामुळे कोणत्या दिवशी कशाला किती रुपये दर मिळाला याची माहिती उपलब्ध होते. आपल्याला योग्य तो दर मिळत असेल तरच आपला शेतमाल बाजारसमितीत घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यास या अँपचा फायदा होतो. यासोबतच सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन खरेदी विक्री आदी सेवाही या अँपवर विनामूल्य देण्यात येत आहेत. आजच तुम्हीसुद्ध Hello Krushi डाउनलोड करून या उपक्रमाचे लाभार्थी बाणा.

पाटण शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात हाोते. येथे पारंपरिक पालकमंत्री शंभूराज देसाई व विक्रमसिंह पाटणकर गटात अटीतटीची लढत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचायत मतदारसंघ जिंकून मंत्री देसाई यांच्या पॅनेलने आघाडी घेतली आहे.
सातारा जिल्हात 93.33% असे विक्रम मतदान मतदारांनी केले आहे. त्यामुळे उमेदवारांचे भवितव्य हे मतदान पेटीमध्ये बंद आहे. यामुळे नेमका गुलाल कोणाच्या अंगावर पडणार आणि कोणाला हार पतकरावी लागणार हे पाहणे उत्सुकताच ठरणार आहे.

पाटण शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा २२५ मतांच्या फरकाने मंत्री शंभूराज देसाई यांच्या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. जोतीराम काळे, समीर भोसले, सिद्धार्थ गायकवाड आणि सुधाकर देसाई हे उमेदवार विजयी झाले आहेत.

तर व्यापारी मतदारसंघाततून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब महाजन( ३३६ मते ) अरविंद पाटील (३२३) मते घेऊन विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना मोठा झटका बसला असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण भिस्त सोसायटी मतदार संघावर आहे.