गुजरात निकालानंतर शंभूराज देसाईंचा टोला; कोणी कितीही यात्रा काढल्या तरी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला धोबीपछाड देत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. भाजप तब्बल १५८ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस आणि आपचा सुफडा साफ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. कोणी कितीही यात्रा काढल्या आणि हातात हात देण्याचा प्रयत्न केला तरी लोक विकासाच्या पाठीशी उभं राहतात असं म्हणत त्यांनी नाव न घेता राहुल गांधींसह महाविकास आघाडीवर टीका केली. ते सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

गुजरातचा निकाल हा देशाला २०२४ च्या निवडणुकीसाठी विचार देणारा निकाल आहे. राज्यामध्ये विकासाचे व्हिजन असेल, लोकांना, राज्यातील आणि देशातील जनतेला अपेक्षित असलेला विकास होत असेल, राज्याची आणि देशाची प्रगती होत असेल, राज्य देशामध्ये पुढे जात असेल आणि देश जागतिक स्तरावर प्रगती करत असेल तर विकास करणाऱ्या आणि व्हिजन असणाऱ्या दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वामागे सर्वसामान्य माणूस उभा राहतो हे गुजरातच्या निकालातून स्पष्ट झालं असे शंभूराज देसाई म्हणाले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/877235356767337/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB

कोणी कितीही यात्रा काढल्या, कोणीही कोणाच्या हातात हात घालायचा प्रयत्न केला तरी सुद्धा लोक विकासाच्या पाठीशी उभे राहतात हे गुजरातच्या निखळावरून स्पष्ट झाल आहे असं म्हणत शंभूराज देसाई यांनी राहुल गांधींसह राज्यातील शरद पवार, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.