नवनिर्वाचित राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे पाटण मतदारसंघात अभुतपूर्व स्वागत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले नामदार शंभुराज देसाई हे आज प्रथमच पाटण मतदार संघात आले. यावेळी कराड-चिपळूण मार्गावर मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे प्रत्येक गावात स्वागत कमानी लावुन स्वागत केलं. गावातील सुवासिनींनी ठिकठिकाणी देसाई यांचे औक्षण केलं. युवक मंडळ संस्थांनी देसाई यांची उत्साहानं यावेळी वही तुला केली.

दरम्यान पाटण तालुक्यातील शंभुराज देसाई समर्थकांमध्ये त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळालं. युवकांनी शंभुराज देसाई यांना डोक्यावर घेऊन जल्लोषात मिरवणुक काढली.

यावेळी माध्यमांशी बोलताना शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निवडणुकीपुर्वी महाराष्ट्रातील जनतेला दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितलं. तसेच कर्जमाफीतून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.