राऊत पोपट हा खोट्या चिट्ठी काढतो; मंत्री शंभूराज देसाईंचा संजय राऊतांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बंडखोरी करत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या सरकारमध्ये येण्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा होत असल्याने याबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवारांच्या सरकारमध्ये येण्याने आम्ही नाराज नसून समाधानी आहोत. तर आमचे आमदार संपर्कात असल्याचे राऊत म्हणत आहेत. राऊत पोपट हा खोट्या चिट्ठी काढतो. यापूर्वी देखील विनायक राऊतांनी अनुभव घेतला आहे”, असे म्हणत देसाई यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

सातारा येथे मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, आमच्यासोबत सत्तेत आलेले आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात चालणार खणखणीत नाणं आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हा महत्त्वाचा चेहरा आहे. पण सर्वच चेहरे महायुतीत आले तर पुढे ब्लँक राहील. शिवसेना, भाजप पक्षातील नेत्यांकडून ज्यावेळी महायुती शपथ घेण्यात आली. त्यापूर्वी नऊ पक्षांची होती. त्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष समाविष्ट झाला असल्यामुळे वज्रमुठ ढिली झाली. आमच्या महायुतीमधील वज्रमुठीतील जो चेहरा राज्याला हवा होता, तोच महायुतीमध्ये आलेला आहे.

अजित पवार ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये होते. त्यावेळी त्यांचा विचार वेगळा होता. आता महायुतीमध्ये ते आले असल्यामुळे त्यांचा विचार वेगळा झाला आहे. वास्तविक अजित पवारांचे विचार आणि धोरण बदलल्यामुळे आम्हालाही बदलावे लागते. अजित पवारांच्या सरकारमध्ये येण्यामुळे आमचे महायुतीचे सरकार आता डबल इंजिनच्या बुलेट ट्रेनसारखे झाले असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.