सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील मोरगिरी – पेठ शिवापूर गावातील गणेश ग्रामीण पतसंस्थेतील घोटाळा उघड झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून या पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. त्यातच आता या बँकेचे चेअरमन हे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
शेतकरी संघटनेचे पाटण अध्यक्ष विजय कुवर यांनी याबाबत थेट आरोप करत बँकेचे तेव्हाचे चेअरमन रमेश गालवे हे पालकमंत्र्यांचे अतिशय जवळचे कार्यकर्त्ये आहेत असं म्हंटल आहे. गणेश ग्रामीण पतसंस्थेत 4 ते 5 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे . याबाबत आम्ही चौकशीची मागणी करूनही सरकार कडून याबाबत आम्हाला कोणतेही सहकार्य मिळालेलं नाही. ऑडिट मध्ये भ्रस्टाचार झालाय हे समोर आले आहे. मात्र येथील स्थानिक नेत्यांचा प्रशासनावर दबाव आहे. या दबावामुळे ऑडीटर ने एफआयआर दाखल केलेला नाही. असं विजय कुवर यांनी म्हंटल. तसेच यापतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांचा पैसा परत देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.
गणेश ग्रामीण पतसंस्थेचे त्याकाळचे चेअरमन रमेश गालवे हे पालकमंत्र्यांचे अतिशय जवळचे कार्यकर्त्ये आहेत. या पतसंस्थेत 1200 खातेदार आणि 800 ठेवीदार आहेत ते सर्व त्यांच्या पक्षाचीच माणसे आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत म्हणजेच जवळपास 2-3 वर्षांपूर्वी पासून कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यात आलं नव्हतं परंतु मंत्रीमहोदयांकडून सुद्धा प्रकरणात कोणतेही लक्ष्य दिले जात नाही त्यामुळे आंदोलन करणे आणि मोर्चा काढणे हाच एकमेव पर्याय आमच्याकडे आहे असं म्हणत विजय कुवर यांनी शंभूराज देसाई याना याप्रकरणी लक्ष्य केलं आहे.