शरद लेवे, पै. संजय पाटील खून प्रकरणातील वकील धैर्यशील पाटील यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी चेअरमन, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा राज्याचे माजी चेअरमन, सातारचे निष्णात फौजदारी विधिज्ञ अ‍ॅड. धैर्यशील पाटील तथा डी.व्ही. पाटील यांचे आज निधन झाले. महाराष्ट्रातील अनेक गाजलेले खटले तसेच सातार्‍यातील नगरसेवक शरद लेवे खून खटला, पैलवान संजय पाटील खून खटला अशा महत्वपूर्ण खटल्यांचे काम त्यांनी पाहिले होते. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ ते वकिली व्यवसायात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने विविध स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आज (बुधवारी) सायंकाळी सदरबझार येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

अ‍ॅड. डी.व्ही. पाटील यांचा जन्म 14 जुलै 1943 रोजी झाला, ते मूळचे नेर्ले (ता. वाळवा, जि.सांगली) येथील होत. वकिलीची पदवी घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यासह देशभर त्यांनी ठिकठिकाणच्या विविध खटल्यांमध्ये काम केले. फौजदारी संहितेवर त्यांची कमालीची पकड राहिली. वकिलीचे काम करत असतानाच संघटन कौशल्य राबवत अनेक सामाजिक संघटनांवर त्यांची निवड झाली. गोरगरीब, कष्टकरी व श्रमिकांसाठी त्यांनी अहोरात्र काम केले.

कामगार व कष्टकरी समाजासाठी त्यांचे काम महत्वपूर्ण राहिले असून डाव्या विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता. अ‍ॅड. डी.व्ही. पाटील यांच्या मागे पत्नी अ‍ॅड.   त्यांचा मुलगा अ‍ॅड. सिध्दार्थ पाटील हे वकिली क्षेत्राचा वारसा जपत आहेत. दुसरा मुलगा निशांत पाटील सातारा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत.