दिल्ली हे शेतकऱ्यांची थकबाकी ठेवणारं शहर – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपला माल घेऊन दिल्लीच्या बाजारात येत असतात. व्यवस्थित दर देण्याची सकारात्मक बाजू लक्षात घेतली तरी हे पैसे देण्यासाठी बराच वेळ शेतकऱ्यांना थांबवलं जात. कृषिमंत्री असताना असे अनेक अनुभव आल्यामुळे दिल्ली हे थकबाकीच शहर आहे असं नाईलाजाने म्हणावं लागतय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या थकबाकीसंदर्भात कायदे कडक करण्याची गरज असल्याच मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, खजिनदार महेंद्र शाहीर, कैलास भोसले उपस्थित होते.
फळबाग क्षेत्रात देशाने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. फळ उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. अन्नधान्य उत्पादनातील प्रगतीमुळे भारत आज निर्यातीत आघाडीवर आहे. यामध्ये द्राक्षासोबतच, आंबा, डाळींब,चिकू,गहू ,साखर यांचाही समावेश आहे.
शेती क्षेत्र विस्तारत असताना त्यातील समस्याही वाढणाऱ्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ व शेतकरी यांनी एकत्र काम करण्याची गरजही पवार यांनी व्यक्त केली.

Leave a Comment