शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची पुण्यात भेट! नेमकी काय झाली चर्चा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी नुकतीच एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकत्र भेट झाली आहे. शुक्रवारी म्हणजेच आज पुणे शहरात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी हे तिघेजण एकत्र आले. तसेच, यांच्यात बराच वेळा चर्चा देखील झाली. त्यामुळे आता राजकिय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

यंदा दिवाळीनिमित्त राजकीय वाद विसरून अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील, अशी आशा सर्वांकडून व्यक्त केली जात होती. अखेर आज तो क्षण दिसून आला. बऱ्याच काळानंतर या तिघांची प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकत्र भेट झाली. प्रतापराव पवार हे शरद पवारांचे बंधू आहेत. सध्या त्यांच्या पत्नीची प्रकृती बरी नाही. यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार प्रतापराव यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते. यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या देखील प्रकृतीचे चौकशी केल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने संपुर्ण पवार कुटुंब गोविंदबाग येथे एकत्र येते. मात्र यावर्षी ही परंपरा खंडित होणार आहे. कारण की, अजित पवार यांना डेंगू झाल्यामुळे ते दिवाळीत बारामतीला येणार नाहीत. याबाबतची माहिती स्वतः अजित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पवार कुटुंबीयांना अजित पवार यांच्याशिवाय साजरी करावी लागणार आहे. मुख्य म्हणजे, असे असले तरी आज अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे.