शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?, चाकरणकरांच्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या 40 आमदारांना घेऊन शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. तेव्हापासून राज्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट पडले आहेत. सध्या या दोन्ही गटांकडून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अजित पवारांनी दौरे आणि शरद पवारांनी सभा घेण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीतच रुपाली चाकरणकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहे, भविष्यात आम्ही पुन्हा एकत्र येणार” असा दावा रूपाली चाकरणकर (Rupali Chakankar) यांच्याकडून करण्यात आला आहे.

रूपाली चाकरणकर यांनी मंगळवारी पुण्यात असताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी, “शेवटी कुटुंब हे कुटुंबच असतं. एकमेकांमध्ये मतभेद असले, तरी मनभेद कुणामध्येही नाही. भविष्यात आम्ही पुन्हा एकत्र येऊ, अजितदादांनी आपली वैचारिक भूमिका मांडली आहे” असे वक्तव्य केले. आता चाकणकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर भविष्यात खरंच हे दोन्ही नेते एकत्र येतील का असा सवाल आता विचारला जात आहे.

तर दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून देखील, “अजित पवार हे आमच्याच गटाचे नेते आहेत सध्या ते फक्त सत्ताधारी पक्षात आणि आम्ही विरोधी पक्षात आहोत” असे सांगण्यात आले आहे. तर, शरद पवार आमच्या ह्रदयात असून त्यांच्यावर टीका करणार नाही असे वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये अंतर्गत नक्की काय सुरू आहे याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच रूपाली चाकरणकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेत आणखीन भर पडली आहे.

दरम्यान, अजित पवार जरी भाजपमध्ये गेले असले तरी आम्ही भाजपमध्ये कधी जाणार आहे असे स्पष्ट भूमिका शरद पवार यांच्याकडून मांडण्यात आली आहे. तर भाजपकडून शरद पवार यांना अनेक खास ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा देखील सध्या सुरू आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून नवा डाव रचण्यात येत आहे का याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मुख्य म्हणजे, अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीनंतर तर लवकरच राज्याच्या राजकारणातील समीकरणे पालटतील असा दावा केला जात आहे.