Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यासाठी शरद पवारांचा मास्टर प्लॅन; टप्प्यात कार्यक्रम करणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवारांवर (Sharad Pawar) प्रेम करणारा जिल्हा म्हणून बारामतीनंतर साताऱ्याकडे बघितलं जाते. महाविकास आघाडीमध्येही सातारा लोकसभेची जागा पवार गटाकडून लढवली जाणार आहे. मात्र निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरीही पवारांनी आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. पक्षातील अंतर्गत कुरबोरीमुळे आणि इच्छुकांची यादी वाढल्यामुळे पवारांनी साताऱ्यासाठी आपला पत्ता अजून खोलला नाही असं बोललं जात असलं तरी पवारांची रणनीती मात्र वेगळीच आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या घोषणेनंतरच शरद पवार आपल्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे.

साताऱ्यातून माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) पुनः एकदा भाजपकडून निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत. मात्र महायुतीत सातारा लोकसभा जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे. भाजपने जर सातारा लोकसभेची निवडणूक लढवली तर उदयनराजे भोसलेच उमेदवार असतील यात तिळमात्र शंका नाही, मात्र सध्या हि जागा भाजप लढवणार कि दादा गट लढणार यावर एकमत चालेल नाही. अजित पवार गटाकडे साताऱ्याची जागा गेली तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील याना तिकीट देण्यात येईल अशाही चर्चा सुरु आहेत. उदयनराजे भोसलेंनी अजित पवारांच्या घड्याळावर निवडणूक लढवावी असा मागणी भाजपकडून करण्यात येत आहे, मात्र राजे त्यासाठी तयार नाहीत. अखेर तोडगा काढण्यासाठी उदयनराजे थेट दिल्लीत गेले असून आज ते अमित शाहूची भेट घेण्याची शक्यता आहे.

शरद पवारांचा प्लॅन काय??

महायुती जो उमेदवार देईल त्यानुसारच शरद पवार आपला सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत असं दिसत आहे. जर महायुतीत साताऱ्याची जागा भाजपला सुटली आणि उदयनराजे मैदानात उतरले तर शरद पवारांकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळू शकते. जर अजित पवार गट साताऱ्याची जागा लढवणार असतील तर शरद पवार शशिकांत शिंदे, सारंग पाटील किंवा बाळासाहेब पाटील यांच्या नावाचा विचार करू शकतात. नुकतंच शरद पवारांनी विधान केलं होते कि कार्यकर्त्यांकडून आपल्याला बारामती, माढा, सातारा किंवा पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी आग्रह केला जातोय. त्यामुळे राजकीय वातावरण बघून शरद पवार स्वतःही सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.