भारताच्या विजयानंतर पवारांचा जल्लोष; सुप्रिया सुळेंनी शेअर केला व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा 5 विकेट राखून पराभव केला. भारताच्या या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा जल्लोष केल्याचा विडिओ समोर आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक विडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये शरद पवार भारत- पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. अखेरच्या वेळी भारताला विजयासाठी ६ धावांची गरज असताना हार्दिक पंड्याने मारलेल्या षटकारानंतर शरद पवारांनी दोन्ही हात उंचावत भारताच्या विजयाचा जल्लोष व्यक्त केला. पवारांच्या या विडिओ ने अनेकांची मने जिंकली आहेत.

दरम्यान, पाकिस्तान विरोधातील सामन्यात भारताकडून गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. पाकिस्तानने भारताला जिंकण्यासाठी 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे आव्हान 5 विकेट्स राखत पूर्ण केले. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने 4, हार्दिक पांड्याने 3 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी अर्शदीप सिंगने 2 विकेट घेतल्या आणि एक विकेट आवेश खानच्या खात्यात गेली. भारताकडून विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने 35-35 धावा केल्या. शेवटी हार्दिक पंड्याने षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.