शरद पवारांनी ED ला उघडं पाडलं; कारवाईंची आकडेवारी दाखवत केली पोलखोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून राज्यात आणि देशात ED कारवाईना वेग आला आहे. मात्र या कारवाया जाणून बुजून विरोधी पक्षातील नेत्यांवरच करण्यात येत आहेत असा आरोप विरोधक करत असतात. एवढच नव्हे तर ज्या नेत्यांवर ईडी कारवाईची टांगती तलवार आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्यावर कारवाई काही काळासाठी तरी थांबलेली आपण बघत आहोत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ईडीची पोलखोल केली आहे. आत्तापर्यंत ईडीने कोणत्या पक्षातील किती नेत्यांवर कारवाई केली याबाबतची आकडेवारीच पवारांनी दिली आहे.

शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवरून (ED Actions) भाजपला लक्ष्य केलं. ईडी, सीबीआय किंवा अन्य यंत्रणांचा विरोधी नेत्यांना दाबण्यासाठी केला जातोय. यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. देशातील यंत्रणेचा वापर नेत्यांचा विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही केला जात नव्हता असं शरद पवारांनी म्हंटल. डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसमधील नेत्यांवर सुद्धा ईडी कारवाई करण्यात आली होती, मात्र आत्ताच्या सरकारमध्ये भाजप नेत्यांवर कधीही ईडीने कारवाई केली नाही असा आरोप पवारांनी केला.

पवारांनी आकडेवारी दाखवत केली पोलखोल –

आत्तापर्यंत ईडीने किती जणांवर कारवाई केली आणि त्यातील किती प्रकरणे निकाली निघाली याची आकडेवारी शरद पवारांनी जाहीर केली. शरद पवारांनी म्हंटल कि, ५ हजार ९०६ कारवायांपैकी केवळ २५ कारवायांचा निर्णय झाला आहे. गेल्या अकरा वर्षामध्ये ईडीने १४१ नेत्यांची चौकशी केली. त्यातील ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील नेते होते. यामध्ये २४ काँग्रेसचे, १९ तृणमूल काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे १८ , शिवसेनेचे ८, डीएमके ६, आरजेडी ५, समाजवादी पार्टी ५, सीपीएम ५, आप ३, नॅशनल कॉन्फरन्स २, मनसे १, पीडीपी २, एआयडीएमके १ आणि टीआरएस १ पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजपच्या नेत्यांची नावे कुठे दिसत नाहीत असेही पवारांनी म्हंटल.