धमक्या देऊन कोणी आवाज बंद करु शकत नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुझा लवकरच दाभोळकर होईल अशी जीवे मारण्याची धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. पवारांना देण्यात आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असतानाच आता स्वतः शरद पवार यांनी याबाबत भाष्य केल आहे. कोणी धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे, मी अशा धमक्यांची चिंता करत नाही असे शरद पवारांनी म्हंटल.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, कोणत्याही विषयावर मत व्यक्त करण्याचा आधिकार सर्व नागरिकांना आहे. आणि असं असताना कोणी धमक्या देऊन कोणाचा आवाज बंद करू असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे. प्रश्न फक्त एकच आहे, महाराष्ट्र सरकारवर ही जबाबदारी आहे आणि महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्थता सांभाळणारी यंत्रणा, पोलिस दल यांच्या कतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुले धमकीची चिंता मी करत नाही असे त्यांनी म्हंटल.

दरम्यान, शरद पवारांना आलेल्या धमकीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.