शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; पहा कोणकोणत्या घोषणा केल्या?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध (Sharad Pawar Group’s Manifesto) करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आदी नेतेमंडळीच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पवार गटाच्या या जाहीरनाम्याला शपथनामा असं संबोधण्यात आलं आहे. समाजातील सर्व घटकांचा, शेतकऱ्यांचा, तरुणांचा, महिलांचा विचार या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. तसेच आमची सत्ता आल्यास ५० % आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी कायदा करू असे आश्वासनही शरद पवार गटाने दिल आहे.

शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात कोणकोणत्या घोषणा?

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणार
बेरोजगार तरुण- तरुणींना पहिल्या वर्षी मदत करणार
जेष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणार
महिला आणि मुलीच्या सुरक्षेसाठी कायदा करणार
शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर GST आकारणार नाही
५० % आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी कायदा करू
गरिबांसाठी रेशन कार्डच्या निकषात बदल करू
कंत्राटी नोकर भरती बंद करू
सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना करू
आरोग्यासाठी उत्तम सेवा पुरवणार

स्पर्धा परीक्षांसाठी आकारलं जाणारे शुल्क माफ करू

युवा, महिला, युवती, शेतकरी, कामगार, उपेक्षित घटक, अल्पसंख्याक अश्या अनेक घटकांचा शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला असल्याचं यावेळी राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे. “जाहीरनामा बनवण्यासाठी मला शरद पवार आणि जयंत पाटील यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. अनेक लोकांकडून माहिती घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे असेही त्यांनी म्हंटल आहे.