शरद पवार निर्णय मागे घेणार? कार्यकर्त्यांना दिला सूचक संदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. पवारांच्या निर्णयानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही अश्रू अनावर झाले होते. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावं अस आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण सुद्धा सुरू केले आहे. यानंतर अखेर वाय. बी. सेंटर बाहेर येऊन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं आहे. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसाव लागणार नाही असं आश्वासन पवारांनी दिल्यानंतर शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का अशा चर्चाना उधाण आलं आहे.

दोन दिवसांपासून वाय.बी.सेंटरच्या बाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते ऐकत नसल्याने अखेरी शरद पवारांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला. उद्या पक्षाचं काम कसं चालावं, त्यातून नवीन नेतृत्व इतरांनी करावं हा यामागचा आमचा हेतू होता. ही गोष्ट खरी आहे की, असे निर्णय घेताना सहकार्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता असते त्यामुळं तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती पण मी अशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी होय म्हटला नसता असं ह्सर्ड पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आता हा जो निर्णय घेतला, त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक तुमचे सहकारी या ठिकाणी आले. माझ्याशी त्यांना बोलायचं आहे. माझी आणि त्यांची भेट संध्याकाळी होईल, ती झाल्यानंतर तुमच्या सर्वांची जी भावना आहे, ती नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरुन आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय १ ते २ दिवसांत करण्याची भूमिका घेऊ. यावेळी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, एवढचं आज सांगतो. २ दिवसानंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही असं शरद पवार यांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.