देशात केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर सुरु; शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या ज्या काही एजन्सीज आहेत कि त्यांनी अनेकांच्यावर कारवाई केली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्यावर कारवाई केली. अशा अनेक घटना अनेक राज्यात घडल्या आहेत. काही ठिकाणी तर ज्यांच्यावर खटले भरले ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील केसेस काढण्यात आल्या. त्याची माहिती आम्ही पत्रात दिली. त्यावर फेर विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र, देशात सध्या केंद्रीय तपास यंत्रणेचा गैर वापर सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी केला.

कराड येथे शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबाबत 9 विरोधी पक्षनेत्यांनी केंद्राला पाठवलया पत्राबाबत भूमिका स्पष्ट केली. यावेळी पवार म्हणाले की, केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक आहे. भाजपमध्ये गेलेल्या लोकांवरील केसेस मागे घेतल्या जातात आणि इतर पक्षांच्या लोकांवर कारवाई होते, हे यंत्रणांचा गैरवापर करण्याचा सिद्ध होत असल्याचं पवारांनी सांगितलं.

तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच जज म्हणून नेमलं तर…

यावेळी शरद पवार यांनी संजय राऊत यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, विधानसभेला अधिकार आहे. समिती नेमायची की नाही. ज्या लोकांनी समिती नेमा आणि संजय राऊत यांना अटक करा, अशी मागणी केली. त्यांनाच त्या समितीत घेतले आहे. एखाद्याने तक्रार केली असेल आणि तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच जज म्हणून नेमलं तर त्याचा निकाल कसा लागेल हा आमचा प्रश्न आहे

कसब्यात भाजपला मतदान झालं नाही हा चेंज : पवार

यावेळी कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही मतदार संघाबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही मतदारसंघ वेगवेगळे आहेत. कसबा हा भाजपचा मतदारसंघ आहे. कसबा पेठ, सदाशिवपेठ नारायण पेठ या भागात वर्षानुवर्ष भाजपला मतदान होत होतं. यावेळी भाजपला या भागात मतदान झालं नाही हा चेंज दिसतो. त्यामुळे राज्यकर्त्यांविरोधात नाराजी असल्याचं दिसून येतं. तसेच चिंचवडमध्ये राहुल कलाटे उभे राहिले नसते तर निकाल वेगळा लागला असता. पण लोकशाहीत प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे, असे पवार म्हणाले.

नवाब मलिकांबाबत कोर्टाने निर्णय दिल्यानंतर भूमिका घेणार

असा प्रचंड गंभीर आरोप करणं प्रचंड राग आहे. ज्या मंत्रिमंडळात नवाब मलिक होते त्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे ही होते. तेव्हा त्यांना जाणवलं होतं का ते राष्ट्रद्रोही आहेत. नवाब मलिक वीस वर्षे विधानसभेत होते. दहा वर्षे मंत्री होते. त्यावेळी त्यांना हे सर्व जाणवलं होतं का? आत्ता सगळं कसं काय जाणवायला लागल आहे, असा सवाल शरद पवार यांनी केला.