शरद पवारांच्या “मराठा कार्ड” ने महायुतीला घाम फुटलाय; लोकसभेला काय आहे मास्टरप्लॅन?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार.. राजकारणातला तेल लावलेला पैलवान.. महाराष्ट्रात कधीही, मराठा आंदोलनाचा भडका उडाला, किंवा तशी चाहुलही लागली, तरी यामागे शरद पवारांचा हात असतो, हे स्टेटमेंट हमखास समोर येतं.. अनेक मराठा नेत्यांनी, पवारांचंं राजकारण , वाईट काळात तारून नेलं, आणि पक्षाला मोठं देखील केलं.. पश्चिम महाराष्ट्रातील, अनेक तालेवार मराठा नेत्यांना सोबत घेत, तर विदर्भ – खानदेशच्या पट्ट्यात, नवख्या मराठा नेतृत्वावर, पवारांनी विश्वास टाकला.. मात्र अजितदादांनी, राष्ट्रवादीत फूट पाडल्यावर, मराठा नेतृत्वाची शरद पवार गटात, मोठी पोकळी तयार झाली.. लोकसभेच्या तोंडावर, पक्ष फोडल्याचा वचपा काढण्यासाठी, पवारांनी म्हणूनच , मराठा कार्ड खेळत, शिंदे, फडणवीस आणि अजितदादांना घाम फोडलाय.. लोकसभेच्या जागावाटपात, दहा जाागा वाट्याला आलेल्या पवारांनी, १० पैकी तब्बल ६ जागांवर मराठा उमेदवाराला संधी दिलीय.. जातीपातीचं, सोशल इंजिनीयरींगचं राजकारणं, पक्कं जमणाऱ्या पवारांना , मराठा समाज, अजितदादांपेक्षा जास्त ताकद देऊ शकतो का?, सध्याचा मराठा समाज, लोकसभा निवडणुकांसाठी गेमचेंजर ठरेल, अशी अवस्था खरंच महाराष्ट्रात आहे का?, मराठा समाजाला जवळ करुन, शरद पवार, नेमकं कोणतं परसेप्शन , बिल्डअप करु पाहतायत?, तेच आज आपण पाहुयात

तर, जवळपास सहा – सात महिन्यांपूर्वीची गोष्ट.. सोशल मीडियावर शरद पवारांचा , शाळा सोडल्याचा दाखला, चांगलाच व्हायरल झाला होता.. याला कारण होतं, दाखल्यावरचा शरद पवारांचा जातीचा उल्लेख.. पवारांची जात मराठा असली, तरी त्यांनी ओबिसी सर्टिफीकेट घेतल्याचं, या दाखल्यातून समोर आलं.. बरीच वादावादी झाली.. पण अखेर, कुणीतरी, खोडसाळपणे हा प्रकार केला असल्याचं सांगत, आपण मराठाच असल्याची लाईन, पवारांनी पुन्हा एकदा हाईलाईट केली.. यावरुन मराठा असण्याची राजकारणात, स्वत:चीच अशी एक युएसपी असते, हे क्लिअर झालं.. अगदी शांततेत निघालेल्या, मराठ्यांच्या मूक मोर्चांपासून, ते काल परवा झालेल्या, मनोज जरांगे पाटलांच्या, आंदोलनाच्या पाठिशी , शरद पवारांच्याच , अदृश्य शक्तीचा हात असल्याचंच बोललं जातं.. एकूणच काय, तर मराठा कार्ड कुठे, कधी, केव्हा आणि कसं बाहेर काढायचं , हे शरद पवारांना चांगलंच जमतं.. पक्षफुटीनंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत, राष्ट्रवादीवरचा आपला क्लेम मजबूत करण्यासाठी, पवारांनी पुन्हा एकदा हेच मराठा कार्ड बाहेर काढलंय.. मविआचा भाग असणाऱ्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला, दहा जागा सुटल्याचं कन्फर्म झालंय.. यातल्या एक – दोन नव्हे , तर तब्बल ६ जागांवर , मराठा उमेदवार उभे करुन , पवारांनी पुन्हा एकदा प्रस्थापित, आणि विस्थापित मराठा समाजाला साद घातली आहे.. पवारांनी ज्या सहा जागांवर, मराठा उमेदवार उभे केलेत , ते सहा मतदारसंघ नेमके कोणते आहेत?, ते एकटा पाहून घेऊयात..

Sharad Pawar यांनी खासदारकीला पुन्हा एकदा जातीय राजकारण सुरु केलंय का?

सर्वात पहिला मतदारसंघ येतो तो वर्ध्याचा…

विदर्भातून पवारांच्या वाट्याला आलेल्या, एकमेव वर्ध्याच्या जागेवरही, पवारांनी कास्ट फॅक्टर लक्षात घेत, पाऊलं टाकली.. माजी आमदार अमर काळे, यांचा पक्ष प्रवेश करवून घेत, त्यांच्या हातात पवाारांनी तुतारी दिली.. खरंतर काळे मराठा -कुणबी.. वर्ध्याच्या राजकारणात ,तेली विरुद्ध मराठा कुणबी , या दोन समाजामध्ये, टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो.. याच संघर्षात वरचढ ठरत, तेली समाजाच्या रामदास तडस, यांनी भाजपकडून, सलग दोन टर्मची खासदारकी, कायम ठेवली आहे.. हाच मतांचा पॅटर्न लक्षात घेऊन, भाजपनं पुन्हा एकदा रामदास तडस, यांचीच उमेदवारी कायम ठेवली.. पवारांना ही जागा सुटल्यावर, त्यांनिही हीच मेख ओळखून, कुणबी – मराठा समाजाच्या काळेंना, रिंगणात उतरवलंय.. त्यामुळे सामना अटीतटीचा होणार, हे तर कन्फर्मय.. मराठा समाजाच्या, तब्बल २३ टक्के व्होट शेअर आपल्याकडे खेचून, विदर्भात तुतारी वाजवण्याचा चान्स, पवारांसाठी चालून आलाय..

दुसरा मतदारसंघ येतो अर्थात बीडचा…

मुंडेंचं प्रस्थ असणाऱ्या बीडमध्ये, मराठा आणि ओबिसी समाज निर्णायक ठरतो.. ओबिसी समाजाची एकगठ्ठा मतं, ज्याच्या पाठीशी, त्याचा विजय हा निश्चित समजला जातो.. इथला बंजारा समाज, हा मुंडेंच्या पाठीशी असल्याने, आणि त्यात, स्वत: पंकजा मुंडे उमेदवार असल्याने, पवारांनी अनेक मराठा चेहऱ्यांची चाचपणी केली.. त्यातही दिवंगत मराठा नेते, विनायक मेटे यांच्या पत्नी, ज्योती मेटे , यांना मैदानात उतरवून, मराठा मतदारांना खेचण्यासाठी, इमोशनल फॅक्टर पवारांना सापडला होता.. मात्र बजरंग सोनावणे यांचा अनुभव, आणि मराठा व्होट शेअर , खेचून आणण्याची क्षमता पाहता, अखेरच्या क्षणी त्यांनाच मैदानात उतरविण्यात आलं.. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन, मराठाड्यातील वातावरण, गरमागरमीचं झालेलं असताना, याचा सोनावणेंनी फायदा उचलला,. तर ते, मुंडेंना कडवं आव्हान उभं करतील..

तिसरा मतदारसंघ आहे तो रावेरचा….

शरद पवारांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता, तो रावेरमधून रक्षा खडसेंना, तोडीस तोड उमेदवार, कोण द्यायचा याचा?, पण रविंद्र भैया पाटील, यांच्या रुपाने त्याला उत्तरं मिळालं.. रावेरमध्ये तब्बल साडेसहा लाख मतदान, एकट्या मराठा समाजाचं आहे.. त्यातंही लेवा पाटील, किंगमेकरच्या भूमिकेत ,यातल्या पाच लाखांत येतो.. नाथाभाऊ आणि शरद पवार, असं कालपर्यंत समीकरण असल्यानं, रक्षा खडसे यांची खासदारकी जवळपास धोक्यात होती.. मात्र नाथाभाऊंना , पुन्हा घरवापसी करावी लागल्याने ,पवारांना उमेदवार शोधण्यासाठी, त्यांना बरीच कसरत करावी लागली.. पण रविंद्र भैया यांच्यासारख्या, मराठा चेहऱ्याला उमेदवारी देऊन , पवारांनी रावेरात , पुन्हा एकदा मराठा विरुद्ध मराठा, अशी लढत घडवून आणलीय..

चौथा आणि सर्वात हॉट सिटवर असलेला मतदारसंघ, अर्थात अहमदनगरचा…

नगरमध्ये सुजय विखे पाटलांची, भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली.. तर दुसरीकडे पवारांनीही निलेश लंकेंसारखा, साधासुधा मराठा चेहरा ,एनवेळी समोर आणत , भाजपला धक्का दिलाय.. विखे पाटील प्रस्थापित मराठा समाजातून येतात.. त्यांच्या राजकारणाच्या केंंद्रबिंदूला, कधीच मराठा समाज आलेला नाहीये.. त्यात दुसरीकडे, लंकेंकडे , गावखेड्यातून मराठ्यांची, मोट बांधायची ताकद असल्यानं, निवडणूक अटीतटीची झालीये.. लंके , नगरमधील पहिले असे उमेदवार असतील , जे पहिल्या पिढीतील, सर्वसामान्य कुटुंबातून, पुढं आलेला मराठा चेहरा असेल.. त्यामुळे लंकेंनी मागच्या पाच वर्षांच्या कामाचा पंचनामा करताना, कुणबी, मराठा केंंद्री राजकारण केलं, तर विखेंना खासदारकी नक्कीच जड जाऊ शकते..

आता बोलुयात पाचव्या म्हणजे मराठ्यांची राजधानी समजल्या जाणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघाबद्धल..

साताऱ्यात मराठा समाजाचा शब्द, हा अंतिम मानला जातो.. म्हणूनच या साखर पट्ट्यात, मराठा उमेदवार देण्याशिवाय ,राजकीय पक्षांनाही पर्याय नसतो.. साताऱ्यातूनही २५ वर्षांपासून, सलग मराठा नेतृत्वाने दिल्लीचं प्रतिनीधित्व केलंंय.. त्यातंही २००९ पासून , उदयनराजे स्वत: निवडून जात असल्याने, साताऱ्याला कट्टर मराठा राजकारणाची धार आहे.. राष्ट्रवादीत असलेल्या राजेंनी, भाजपशी सलगी केल्याने, आता राजेंच्या विरोधात कुणाला उभं करायचं, याचा मोठा प्रश्न पवारांना होता.. श्रीनिवास पाटील वयोमानाच्या कारणाने, निवडणुक लढवू शकत नव्हते.. अशा वेळेस पवारांनी, मोठा डाव टाकत, थेट शशिकांत शिंदेंना तुतारीच्या चिन्हावरुन मैदानात उतरवलंं.. मराठा वर्सेस मराठा, अशी महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिष्ठेची, कुठली निवडणुक असेल, तर ती साताऱ्याची.. छत्रपती घराण्यातून येऊनही, उदयनराजेंंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर, साधा शब्दही काढला नाही.. हा धागा पकडत, शिंदेंनी प्रचाराला धार आणली, तर मराठा टक्का हा शशिकांत शिंदेंच्या बाजूने झुकू शकतो.. एकुणच साताऱ्यातलं पवारांचं मराठा कार्ड, हे भाजपच्या सर्वात जास्त छातीत धडकी भरवणारं आहे..

शेवटची जी जागा पवारांना सुटली असली, तरी त्या जागेवरुन अद्याप, उमेदवार जाहीर झालेला नाहीये. ती जागा म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ.. काहीही झालं, तरी माढ्याची जागा पवार, मराठा उमेदवाराला सोडतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ.. या जागेसाठी पवार चाचपणी करत असताना , सर्वात पहिलं नाव घेतलं जातंय, ते धैर्यशिल मोहिते पाटलांचं.. भाजपात तिकीट न भेटल्यानं, मोहितेंंना पवार जवळ करुन, उमेदवारी देतील, याची दाट शक्यता असल्याने, भाजपही धास्तावली आहे.. मोहिते पाटलांना जिल्ह्यात मानणारा, वर्ग मोठा आहेच, त्यात मराठ्यांची ताकद , ही नेहमीच त्यांच्या राजकारणाच्या, पाठीशी उभी राहत आल्याने, जर का मोहिते पाटील, तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढणार असतील, तर त्यांचे निवडून येण्याचे, सर्वाधिक चान्सेस असल्याचं बोललं जातंय..

एकूणच पवारांना, बहुतांश पश्चिम महाष्ट्राच्या जागा सुटल्यानं, आणि मराठा, कुणबी हा सध्या सगळ्यात जास्त कळीचा मुद्दा ठरल्यानं, आपले बहुतांश उमेदवार, मराठा समाजातील दिले आहेत.. सामाजिक सलोखा ,आणि सर्वसमावेशक उमेदवारीच्या नादात न अडकता, प्रॅक्टीकली आव्हान देणारेे, आणि सोशल इंजिनीअर घडवून आणतील, अशा चेहऱ्यांना पवारांनी संधी दिली आहे.. पवारांनी याआधी अनेकदा टाकलेलं मराठा कार्ड, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला निर्णायक वळण देणारं ठरलंय.. त्यात आता पुन्हा एकदा, उरल्या सुरल्या पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी, पवारांचे हे मराठा उमेदवार , महायुतीला घाम फोडतील का? तुम्हाला काय वाटत ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा