Sharad Pawar On INDIA Alliance : INDIA आघाडीत नेमका वाद कशाचा?? शरद पवारांनी सगळंच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sharad Pawar On INDIA Alliance : केंद्रातील मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या काही बैठकाही पार पडल्या. परंतु नंतर जागावाटपावरून आघाडीत तिढा निर्माण झाल्याचे आपण बघितलं. पश्चिम बंगाल आणि दिल्लीत आम आदमी पार्टीने स्वबळाची नारा दिला आहे, तर इतर राज्यात सुद्धा अजून जागावाटप झालेले नाही. या सर्व परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना विचारलं असता इंडिया आघाडीमध्ये नेमका कशाबद्दल वाद आहे हे त्यांनी सविस्तर सांगितलं.

इंडिया आघाडीत काही ठिकाणी वादविवाद- Sharad Pawar On INDIA Alliance

शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. आईवेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र काम करावं असं वाटतं. मात्र यातील काही पक्ष हे त्या त्या राज्यांपुरते मर्यादित आहेत. अशा ठिकाणी त्या राज्यातील आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. ती प्रक्रिया सुरू आहे. मात्र काही ठिकाणी वादविवाद सुरू आहेत. उदाहणार्थ उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये जागावाटपाबाबत एकवाक्यता झालेली नाही. पश्चिम बंगालमध्येही अशीच परिस्थिती आहे. तिथे अडचणी अधिक आहेत. पश्चिम बंगालमध्ये आघाडीतील पक्षच एकमेकांचे विरोधी पक्ष आहे. तृणमूल काँग्रेस विरुद्ध सीपीआय, तृणमूल काँग्रेस विरुद्ध काँग्रेस हे एकमेकांचे विरोधक आहेत. हे प्रश्न अजूनही आम्ही हाताळलेले नाहीत. अशा ठिकाणी आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून तोडगा काढला पाहिजे, असा सल्ला (Sharad Pawar On INDIA Alliance) पवारांनी दिला.

यावेळी राज्यातील जागावाटपाबाबत विचारलं असता, महाराष्ट्रातील चर्चेबाबत आमच्याकडून मी असत नाही. आमच्याकडून जयंत पाटील, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि शिवसेनेकडून संजय राऊत चर्चा करतात असं उत्तर पवारांनी दिले. यावेळी शरद पवारांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरही भाष्य केलं. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला आश्चर्य वाटत नाही. केंद्र सरकारने आदर्श बाबत एक श्वेतपत्र काढले आणि जे व्हायचं ते झालं, असा टोला शरद पवारांनी लगावला.