शरद पवारच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष; बैठकीत एकमुखाने फेरनिवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) अध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचा अर्ज आलाच नाही. त्यामुळे शरद पवार हेच रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार हेच रयतचे अध्यक्ष राहिले आहेत.

आज सातारा येथे शरद पवारांच्या उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कोन्सिलच्या बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष पदासाठी शरद पवारांचा एकच अर्ज आला. शरद पवार यांचा अर्ज वगळता आणखी कुणाचाही अर्ज आलेला त्यामुळे एकमुखाने पवारांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले. ही बैठक अजूनही संपलेली नसून इतर सदस्यांच्या निवडीच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे.

दरम्यान, शरद पवारांनी शरद पवारांनी अध्यक्ष होण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभ्या केलेल्या रयत शिक्षण संस्थेची घटना बदलली असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता, त्यावर पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळेंच वक्तव्य पोरकटपणाचे आहे, मी रयतची घटना बदलली नाही. अनेक वर्ष मी या संस्थेत आहे , यामुळं मी घटनेत बदल करायचा संबंध नाही असा पलटवार पवारांनी पत्रकार परिषदेत केला.