फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच अजित पवार यांच्यासोबत 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी पार पडला असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यांनतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यानंतर खुद्द शरद पवारांना विचारलं असताना त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

प्रसारमाध्यमानी शरद पवारांना फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबाबत छेडले असता , मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारचं स्टेटमेंट करतील असं मला कधी वाटलं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

फडणवीस नेमकं काय म्हणाले होते-

माझा 2 वेळा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरेंकडून झाला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढवल्या आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. त्यांनतर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा केली. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या.

अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. मात्र त्यानंतर काय स्ट्रॅटेजी बदलल्या आणि अजित पवार कसे तोंडघशी पडले हे तेच सांगतील. जर त्यांनी नाही सांगितलं तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन”, असेही फडणवीसांनी सांगितलं.