पोरांची लग्न ठरत नाहीत अशा वयात शरद पवार मुख्यमंत्री कसे बनले?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक अतिशय महत्वाचं नाव म्हणजे शरद पवार (Sharad Pawar). राजकीय क्षेत्रात होणाऱ्या कोणत्याही घडामोडींमध्ये पवारांचा हात आहे का हे पहिल्यांदा तपासलं जातं. कुठे काहीही होवो, जोवर शरद पवार त्यावर काही भाष्य करत नाहीत तोवर त्यांच्या भूमिकेबाबत कोणीच अंदाज लावत नाही. कारण शरद पवार कधी काय करतील याचा नेम नाही.

तसंच ते राजकारणात कधी कोणाचा गेम करतील याचाही नेम नाही. तर अशा या शरद पवारांनी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी बरोबर आजच्याच दिवशी मुख्यामंत्री पदाची पहिल्यांदा शपथ घेतली होती. सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांचा देशभर गाजावाजा झाला होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात तेव्हा नक्की काय घडलं होतं? सध्या लग्नगाठ बांधायला लोकांना चाळीशी होत असताना पवारांनी मुख्यमंत्रीपद कसं भूषवलं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.

YouTube video player

1978 ला काय झालं होत?

दिवस होता 18 जुलै इ.स. 1978 चा. तरुण शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला. पण ह्या मागचा प्रवास हा अतिशय खडतर होता. त्याच झालं असं होत की, इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्यांनी देशातील कठीण परिस्थिती बघून आणीबाणी लावली. आणि काही काळ देशातील सर्वच गोष्टीवर निर्बंध लादले गेले. ह्यानंतर ज्या नवीन निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत इंदिरा ह्यांना यश न मिळाल्यामुळे आणि आधीच आणीबाणीच्या परिस्थितीमुळे काँग्रेस मध्ये असलेल्या नाराजीने डोक वर काढलं. आणि काँग्रेसचे दोन तुकडे झाले. एक इंदिरा गांधी आणि दुसरा यशवंतराव चव्हाण…

यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) ह्यांचे शिष्य म्हणजे शरद पवार ह्यांनी आपल्या गुरुसमवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि राजकारणात आपला जोर बसवला. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे जनता पक्षांसोबत न जाता दोन्ही काँग्रेस पक्षांनी म्हणजेच रेड्डी आणि चव्हाण यांनी एकत्र येत संसार थाटला. पण एकमेकांमधील असलेली नाराजी सत्तेचा जम बसू देत नव्हती. अन शेवटी भांड्याला भांडं लागलं अन…

कसे बनले शरद पवार मुख्यमंत्री?

महराष्ट्रातील त्या काळची ऐकंदरीत परिस्थिती बघता नवीन सरकार स्थापन करण्याचा विचार सुरु झाला. ह्यातच 1978 साली पावसाळी अधिवेशन सुरू होतं. याच संधीचा फायदा घेत वसंतदादांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या शरद पवार यांनी आपल्या काही मुख्य नेतृत्वासोबत एकूण 38 आमदारांना घेऊन भर अधिवेशनात बंडखोरी करत दादासाहेब रुपवते यांच्या साहाय्याने ‘समांतर काँग्रेस’ हा नवा गट स्थापन केला.

या झालेल्या बंडखोरीने वसंतदादांचं सरकार अल्पमतात गेलं आणि सरकार पडलं. ह्यातच आपला फायदा बघत जनता पक्षानं शरद पवारांच्या समांतर काँग्रेसला पाठिंबा दिला आणि त्यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली. आणि ते म्हणतात ना “अगर किसी चीज को पुरे दिल से चाहो तो पुरी कायनात तुम्हे उसे मिलाने के लिये लग जाती हैं” , आकदी त्याचप्रमाणे पवारांचे मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी प्रयत्न चालू होते.

पवार यांनी त्यावेळचे राज्यपाल सादिक अली यांची 18 जुलै 1978 रोजी भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. आणि त्याच दिवशी म्हणजे 18 जुलै 1978 रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि वयाच्या अवघ्या 38 वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून मान पटकावत पवार महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. इथून सूरु झालेली शरद पवारांची राजकीय कारकीर्द आजही तेवढ्याच ठाम पणे उभी आहे.