Monday, January 30, 2023

शरद पवार जादूटोणा करणारे भोंदूबाबा; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता, खास करून राष्ट्रवादीने केला होता. त्यामुळे ते पवार साहेबांकडे गेले. जादूटोणा करणारा बाबा कोण हे पूर्ण देशाला अन् महाराष्ट्राला माहिती. शरद पवारांच्या संपर्कात कोणी आलं तर तो सूटत नाही. असे सांगून शरद पवार भोंदूबाबा आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना लागवला.

साताऱ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत मागील सरकारमधील रखडलेली कामे मार्गी लावण्यात येतील असे सांगत शिवप्रताप दिन उत्सव समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांनी प्रतापगड येथील कबर परिसरातील अतिक्रमण हटवण्यात जो लढा दिला त्याचे कौतुक केल. तर मतांचे राजकारण करण्याकरिता हे अतिक्रमण काढण्यास उद्धव ठाकरे यांची हिम्मत झाली नाही, असा आरोपही केला.

- Advertisement -

जयंतराव तुमची महाराष्ट्रात कधीच सत्ता येणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे
राष्ट्रवादीचे घड्याळ बारामतीमध्ये बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. बारामती शहराचा विकास म्हणजे लोकसभा मतदार संघाचा विकास नाही. अजित दादा नेमके काय करतील हे कोणालाच कळणार नाही, ते त्यांनाच माहीत असतं. जयंत पाटील यांनी सत्तेच स्वप्न सोडून दिले पाहिजे. आजही ते स्वप्नात असतील. त्यांना सत्ता गेल्याचे वाटत नसेल. जयंतराव तुमची महाराष्ट्रात कधीच सत्ता येणार नाही. आम्ही दोनशेपेक्षा अधिक जागा आणणार आहोत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.