Wednesday, February 1, 2023

शरद पवारांच्या तब्ब्येतीबाबत मोठी अपडेट; ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर येत आहे. शरद पवार उद्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होणार असून त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समजत आहे.

शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना 18 जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी शरद पवारांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आधीची शस्त्रक्रिया सुद्धा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाली होती.

- Advertisement -

दरम्यान, २-३ महिन्यांपूर्वी शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्ब्येत बरी नसतानाही शरद पवारांनी तेव्हा शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला हजेरी लावली होती. त्यांनतर ते पुहा एकदा रुग्णालयात भरती झाले होते. शरद पवार हे नेहमीच आपल्या लढाऊ वृत्तीची ओळखले जातात. वयाच्या ८३ व्या वर्षी सुद्धा तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने त्यांचे दौरे सुरूच आहेत.