धनुष्यबाण गोठवल्यानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की ज्याची …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ज्याची भीती होती तेच अखेर घडलं असं म्हंटल आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

धनुष्यबाण गोठवलं यांचं मला अजिबात आश्चर्य वाटतं नाही, हे होणारच याची मला खात्री होती .. अखेर तेच घडलं असं पवार म्हणाले. योग्य निर्णय दिले जातील याची आता खात्रीही नाही, असा टोला देखील पवारांनी यावेळी लगावला आहे. मी स्वतः वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आहे. त्यामुळे चिन्हाचा जास्त काही फरक पडत नाही .. लोकच सर्व काही ठरवतात. चिन्ह असो वा नसो निवडणुकीला सामोरे जायची तयारी ठेवली पाहिजे असा सल्ला पवारांनी दिला.

शिवसेना संपणार नाही तर उलट शिवसेना अधिक जोमाने उभी राहील. शिवसेनेतील तरुण पिढी जिद्दीने उठेल आणि आपली शक्ती वाढवेल असं शरद पवारांनी म्हंटल. राज्यात महाविकास आघाडी कायम राहील. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी कायम एकत्र राहतील असेही त्यांनी स्पष्ट केलं.