Wednesday, October 5, 2022

Buy now

दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचा सल्ला; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा मेळाव्या वरून शिवसेना आणि शिंदे गटात मोठा सामना पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी दोन्ही गटाचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना म्हंटल की, मेळावे घेण्याचा सर्वांना अधिकार आहे पण , मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. तसेच सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे असा सल्ला शरद पवार यांनी दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं पवारांचा सल्ला ऐकतात कि वेगळी भूमिका घेतात हे आता पाहावं लागेल. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी यासाठी अनिल परब यांच्याकडून 23 ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेला अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही दसरा मेळाव्यावरून सुरु असलेल्या वादावर आपलं मत व्यक्त करत म्हंटल की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा घेत आहेत. त्यांच्या नंतर उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेत आहेत. उद्धव ठाकरेच शिवसेनेचं मुख्य असतील असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होत. पण आता ज्यांच्या हातात पॉवर आहे ते पाहिजे तशा गोष्टी करतात. आधी एकाचा आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. वाद घालू नका असं म्हणत जनता कोणाच्या पाठीशी आहे हे शिवाजी पार्कवरील सभा झाल्यानंतरच कळेल, असा टोला अजित पवारांनी शिंदे गटाला लगावला.