दसऱ्याच्या दिवशी शरद पवारांची सभा, तर नंतर अजित पवारांचा राज्यव्यापी दौरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) हे दोन्ही गट संघटन बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दसऱ्यानंतर राज्यव्यापी दौरा सुरू होणार आहे. तर दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात शरद पवार यांची भव्य सभा पार पडणार आहे. त्यामुळे हे दोन्ही गट निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे पक्षाची दोन गटात विभागणी झाली आहे. त्यामुळे आता एकीकडे अजित पवार यांना आणि दुसरीकडे शरद पवार यांनी संघटन मजबूत करण्यासाठी जोर धरला आहे.

दसरा संपला की अजित पवार राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहे. या दौऱ्यामध्ये अजित पवार संघटन मजबूत करण्यावर आणि निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यावर जास्त भर देतील. या दौऱ्यामध्ये अजित पवार यांच्याकडून नागरिकांचे प्रश्न समजून घेतले जातील. याबाबतची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. सध्या अजित पवार यांचा वेगळा गट निर्णय झाल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या गटाला टक्कर देण्यासाठी शरद पवार गटाकडून देखील तितकेच प्रयत्न केले जातील. ज्यामुळे हे दोन्ही गट पहिल्यांदा आमने सामने भिडतील.

मुख्य म्हणजे, दुसरीकडे दसऱ्याच्या दिवशी शरद पवार यांची देखील पुण्यामध्ये भव्यसभा पार पडेल. यापूर्वी शरद पवार यांच्या मागील तीन सभा बीड, येवला, कोल्हापूर याठिकाणी झाल्या आहेत. आता त्यांची चौथी सभा पुण्यात होत आहे. या सभेमधूनच रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला देखील सुरूवात होणार आहे. दरम्यान पक्षफुटी झाल्यानंतर आगामी निवडणुकांसाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये शरद पवार विरोधात अजित पवार असे चित्र पाहिला मिळेल. तसेच, या निवडणुकांमध्ये दोन्ही गटात नेमकं कोण बाजी मारेल हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल.