हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sharad Sonawane लोकवस्तीवर आणि शेतात बिबट्याचा (Leopard) वावर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बिबट्याने अनेकांचा जीव घेतल्याच्या घटना दररोज पाहायला मिळतायत. अनेकदा तर रात्रीच्या अंधारात बिबट्या इकडे तिकडे फटकताना दिसतोय. पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात तर बिबट्याची मोठी दहशत आहे. खास करून पुणे आणि जुन्नर भागात बिबट्याने अक्षरशा धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच सध्या नागपुरात राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरु असून तिथेही बिबट्याचीच चर्चा सुरु आहेत. अशावेळी सरकारनं त्यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात या मागणीसह जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी अधिवेशनादरम्यान चक्क बिबट्याचा वेशात विधानभवनात प्रवेश केला आणि संपूर्ण राज्याचे लक्ष्य वेधून घेतलं.
यावेळी शरद सोनावणे (Sharad Sonawane) म्हणाले, माझ्या विभागात ३ महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यात ५५ बळी गेले होते. २०१४-१५ च्या अधिवेशनात हा धोका मी शासनाला सांगितला होता. हा मांजर कुळातील प्राणी शेड्यूल एकचा नसून शेड्यूल दोनचा आहे. पण त्यावेळी कोणी काही मनावर घेतले नाही. आजही बिबट्यांना पकडायचं सोडून सरकार महिलांना, शेतकऱ्यांना, मुलाबाळांना काटरे लोखंडी पट्टा मानेला लावण्याचा सल्ला देत आहे. आमची मुलं अंगणात नाही. रस्त्यावर दिसत नाही. शाळेमध्ये जात नाही. घराभोवती तारेचं कुंपण करुन त्यात करंट सोडून आम्हाला आता बसण्याची वेळ आली आहे. मला असं वाटतं की आता तरी त्यावर काहीतरी तोडगा काढावा.
2 रेस्क्यू सेंटर तयार करा- Sharad Sonawane
आपण मुंबईत फ्लॅटमध्ये राहत असल्यानं तुम्हाला ग्रामीण भागातील परिस्थिती, जनतेची अडचण माहित नाही. ऊस पट्ट्यात हजारोंच्या माणूस मेल्यावर २५ लाख दिले जातात. माणसाची किंमत २५ लाख होऊ शकत नाही. आम्हाला पैसा नको. तर शासनाने या समस्येची दखल घेऊन दोन रेस्क्यू सेंटर बनवावेत. दोन हजार बिबटे राहतील असं रेस्क्यू सेंटर येत्या तीन महिन्यात तयार करा. एक हजार मादी बिबट्या, नर बिबट्या वेगळे करा. त्यामुळे नसबंदीचा विषय मिटेल. एक सेंटर जुन्नर मध्ये आणि दुसरे सेंटर अहिल्यानगरमध्ये असावे. अशी मागणी त्यांनी केली. इथून पुढं बिबट्यामुळं एकही बळी सामान्य जनतेला मान्य नाही आणि असा एकही बळी जात असेल तर त्याला आपण सगळे, सरकार जबाबदार आहे असं म्हणत शरद सोनावणे यांनी बिबटया हल्लयाचे गांभीर्य समजवून सांगितलं.




