Wednesday, March 29, 2023

शार्दूल ठाकूर अडकला विवाहबंधनात; मराठमोळ्या मितालीसोबत घेतले 7 फेरे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । के एल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर भारतीय संघाचा स्टार गोलंदाज शार्दूल ठाकूर विवाहबंधनात अडकला आहे. शार्दुलने त्याची मराठमोळी गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत आज लग्न केले आहे. मुंबई येथे मराठी रितीरिवाजाप्रमाणे हा विवाहसोहळा पार पडला. 25 फेब्रुवारी पासून या विवाहसोहळ्याचा कार्यक्रम सुरु होता.

मोठ्या थाटामाटात शार्दूल आणि मिताली चे लग्न पार पडलं. लग्नापूर्वी संगीत समारंभ आणि हळदी समारंभही आयोजित करण्यात आले होते. यावेळी भारतीय संघच कर्णधार रोहित शर्मा, युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री, श्रेयश अय्यर, मुंबईचा स्थानिक खेळाडू सिद्धेश लाड, अभिषेक नायर उपस्थित होते. सोशल मीडियावर शार्दूल ठाकूरच्या लग्नाचा फोटो समोर आला आहे.

- Advertisement -

 

नोव्हेंबर 2021 मध्ये शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांचा साखरपुडा पार पडला होता. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. मिताली एक बिझनेसवुमन असून त्यांनी ‘द बेक्स’ कंपनीची स्थापना केली. मुंबई आणि ठाण्यात ही कंपनी असून बेकरी आइटम्स विक्री करते.

दरम्यान, शार्दूल ठाकूरने आत्तापर्यंत भारतीय संघाकडून 8 कसोटी, 34 एकदिवसीय सामने आणि 25 T20 सामने खेळले आहेत. आयपीएल मध्ये आत्तापर्यंत त्याने 75 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. त्याला लॉर्ड शार्दूल असेही म्हंटल जात. गेल्या अनेक वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्स कडून खेळणारा शार्दूल यंदा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसेल.