Share Market मध्ये भूकंप!! सेन्सेक्स 3000 अंकांनी घसरला;19 लाख कोटी बुडाले

Share Market Crashed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणाचा फटका संपूर्ण जगाला आणि खास करून भारताला बसताना दिसतोय. शेअर बाजारावर (Share Market) याचा मोठा परिणाम झालाय. आज म्हणजेच ७ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार उघडताच कोसळला. प्री-ओपन ट्रेडमध्ये, सेन्सेक्स 3000 पेक्षा जास्त अंकांनी घसरून ७१,४४९ च्या आसपास पोहोचला, तर निफ्टी १,१०० पेक्षा जास्त अंकांनी घसरून २१,७५८ च्या खाली घसरला आहे. शेअर मार्केट मधील या हाहाकारामुळे अवघ्या १० सेकंदात गुंतवणूकदारांचे तब्बल 19 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. त्यामुळे आजचा दिवस शेअर मार्केट साठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला आहे.

कोणकोणते शेअर्स घसरले ? Share Market

आज सकाळी ९.१५ वाजता सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्स २,६३९.९५ अंकांनी किंवा ३.५० टक्क्यांनी घसरून ७२,७२४.७४ वर ट्रेड करत होता. तर निफ्टी ८६९.१० अंकांनी किंवा ३.७९ टक्क्यांनी घसरून २२,०३५.३५ वर ट्रेंड करत आहे. . प्रत्येक क्षेत्राचा निफ्टी निर्देशांक लाल रंगात आहे. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 5 टक्के घसरले आहेत. निफ्टीमध्ये ट्रेंट, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स आणि ओएनजीसी कंपनीचे शेअर सर्वात जास्त घसरले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ६-६ टक्क्यांनी घसरले आहेत. या घसरणीचे कारण जागतिक बाजारपेठेतील सततची घसरण आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण असल्याचे मानले जाते, ज्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. यापूर्वी जपान, हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियासारख्या शेअर मार्केट मधेही (Share Market) मोठी घसरण दिसून आली.

गेल्या आठवड्यात, ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स २,०५०.२३ अंकांनी किंवा २.६४ टक्क्यांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६१४.८ अंकांनी किंवा २.६१ टक्क्यांनी घसरला. गेल्या आठवड्यात, सेन्सेक्सच्या टॉप १० कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांचे बाजार भांडवल एकत्रितपणे २,९४,१७०.१६ कोटी रुपयांनी घसरले. शेअर बाजारातील या पडझडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.