व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Share Market : HDFC बँकेच्या शेअर्समध्ये तुफान तेजी; ‘या’ कारणाने गुंतवणूकदार झाले मालामाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC च्या शेअर्समध्ये सोमवारी चांगलीच तेजी पहायला मिळाली. सोमवारी एकीकडे शेअर बाजारात घसरण असताना दुसरीकडे HDFC च्या शेअर्समध्ये मोठी वाढ झालेली दिसली. एचडीएफसी बँकेचा शेअर्स 1600 रुपयांच्या पार गेलेला पहायला मिळाला.

एचडीएफसी बँकेचे शेअर्स शुक्रवारी 1581.55 रुपयांनी बंद झाले होते. काळ सोमवारी ते 1611.00 वर उघडले. दुपारी बारा वाजता हा शेअर 1608 रुपयांवर व्यवहार करत होता. कालच्या ट्रेंगिग सत्रात एचडीएफसी च्या शेअरने 1614.25 रुपयांचा उच्चांक गाठला होता, तर कमीत कमी 1603.65 रुपयांवर या शेअरचा व्यवहार सुरु होता.

HDFC च्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण काय?

काही दिवसांपूर्वी RBI कडून HDFC बँकेला HDFC लिमिटेड कडून मंजुरी मिळाल्यानंतर मॅच्युरिटी पर्यंत कमर्शियल पेपर होल्ड करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये एचडीएफसी बँकेचे एचडीएफसी लिमिटेड मध्ये विलीनीकरण केले होते. त्यानंतर एचडीएफसी लिमिटेड ने जारी केलेले कमर्शियल पेपर रद्द करू नका. असं केंद्रीय बँकेने एचडीएफसी बँकेला सांगितलेलं होतं.

शुक्रवारी एचडीएफसी बँकच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या नियामक फायलिंग मध्ये म्हटल्याप्रमाणे, एचडीएफसी लिमिटेडने जारी केलेल्या व्यवसायिक पेपरवर स्पष्टता मागण्यासाठी बँकेच्या वतीने आरबीआयला विनंती पाठवण्यात आलेली होती. यावर आरबीआय म्हणाले आहे की, एचडीएफसी लिमिटेड ने जारी केलेले व्यावसायिक पेपर मॅच्युरिटी होईपर्यंत ठेवू शकतात. एकदा विलीनीकरण झाले की, बँक रोलओव्हर करू शकणार नाही आणि ते पुन्हा जारी करू शकणार नाही.