व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Share Market : शेअर बाजारातील ‘या’ 4 कंपन्या देत आहे डिवीडेंट; जाणून घ्या डिटेल्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर मार्केट मधील HDFC, HDFC BANK, GM BREWERIES आणि SUNDRAM FASTERENES या चार कंपन्यांनी आपल्या गुंवणूकदारांना डिवीडेंटचे गिफ्ट दिले आहे. शेअर बाजारात काल एकूण 7 कंपन्यांनी डिवीडेंट घोषित केले आहे. त्यातील 4 प्रमुख कंपन्यांच्या डिवीडेंटची माहिती उपलब्ध झाली असून आपण आज त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

1. HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD

शेअर बाजारातील उपलब्ध माहितीनुसार कंपनीने प्रत्येक शेअर मागे 44 रुपयांचा डिवीडेंट घोषित केला आहे .गुंवणूकदारांना त्यांचा डिवीडेंट 3 जून 2023 रोजी देण्यात येईल. आज सकाळी 1.27 टक्क्यांनी हा शेअर घसरत 2736.10 रुपयांवर स्थिरावला

2.HDFC BANK

खासगी क्षेत्रातील अत्यंत महत्वाची बँक म्हणून गणली जाणाऱ्या या बँकेच्या शेअरने प्रति शेअरमागे 19 रुपयांचा डिवीडेंट घोषित केला आहे. आज 1658 रुपयांवर स्थिरावणाऱ्या ह्या शेअरमध्ये 1 टक्क्याची घसरण नोंदवण्यात आली.

3.GM BREWERIES

आजच रेकॉर्ड डेट असणाऱ्या GM BREWERIES कंपनीने 0.29 टक्क्यांची घसरण नोंदवत 567. 50 रुपयांवर स्थिरावला सदर कंपनी गेल्या 6 महिन्यांत 4 टक्क्यांची घसरण नोंदवत आहे. GM BREWERIES कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर मागे 6 रुपयांचा डिवीडेंट घोषित केला आहे.

4. SUNDRAM FASTENERS

मंगळवारी सकाळी 1 41 टक्के घसरत SUNDRAM FASTENERS शेअर 1056 रुपयांवर ट्रेड करत होता. 3.06 रुपये प्रति शेअर ह्या दराने सध्या कंपनीने डिवीडेंट घोषित केला असून 3 जून 2023 रोजी तो गुंतवणूकदारांना देण्यात येईल.