Satara Lok Sabha Election 2024 : उदयनराजे Vs शशिकांत शिंदे लढतीत कोण वरचढ ठरेल? साताऱ्याचे राजकारण नेमकं आहे तरी कसं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर साताऱ्यात लोकसभेची (Satara Lok Sabha Election 2024) निडवणूक कोणत्या नेत्यांमध्ये होणार ते जाहीर झालं आहे. त्यानुसार भाजकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांना आव्हान देतील. त्यामुळे यंदाही साताऱ्यात काटे कि टक्कर पाहायला मिळेल यात शंकाच नाही. शरद पवारांच्यावर प्रेम करणारा सातारा जिल्हा त्यांच्या एकनिष्ठ समर्थकाला न्याय देणार कि उदयनराजे बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य आहे. उदयनराजे अन शशिकांत शिंदे दोघही वाघ असल्यानं कोणाची डरकाळी मोठी याचाच फैसला आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं होणार आहे. साताऱ्याचा पुढील खासदार कोण होणार? उदयनराजेंना साताऱ्यात कोणत्या भागात लीड मिळू शकतं तर शिंदे कुठे वरचढ ठरू शकतात? हेच आज जाणून घेऊयात….

सुरवात करूयात साताऱ्यातील तरुणाईपासून…. हवा, क्रेझ आणि करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर तरुणाईचा सपोर्ट मिळवता येणं सर्वात प्रायॉरिटीची गोष्ट असतेय. याबाबतीत सध्या तरी स्टाईल इज स्टाईल म्हणणारे उदयनराजे शिंदेंना वरचढ ठरत आहेत. सातारा व जावळी या भागात उदयनराजे यांच्यावर प्रेम करणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे. या तालुक्यातील युवक हे महाराजांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मानतात, प्रेम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याचा उदयनराजे यांना मोठा फायदा होत असतो. आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये या भागातील तरुण मोठ्या प्रमाणात उदयनराजेना साथ देत आले आहेत. हा त्यांचा प्लस पॉईंट आहे .याच भागात शिवेंद्रराजे भोसले यांची साथ उदयनराजेंना यावेळी मिळेल असं बोललं जातंय.

Udayanraje Bhosale यांना कोणत्या भागात लीड मिळू शकतं? शशिकांत शिंदे यांना कोण पडद्यामागून मदत करणार?

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा जिल्हा शरद पवारांना मानणारा जिल्हा म्हणून राज्यभर परिचित आहे… सातारा ही भूमी वीरांची क्रांतिकारकांची भूमी आहे.या मातीने देशाला अनेक नरवीर दिले आहेत. स्वतंत्र चळवळीत तर क्रांतीकारकांची खाण म्हणून या जिल्ह्याचा संपूर्ण देशभर परिचय होता. स्वतंत्र्यानंतर या भूमितील किसनवीर, यशवंतराव चव्हाण,क्रांतीसिंह नाना पाटील हे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले.आपल्या कार्यातून जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर घेऊन गेले. यशवंतराव चव्हाण हे देशाचे संरक्षणमंत्री,अर्थमंत्री परराष्ट्रमंत्री अशा पदावरती काम केले. नंतर या जिल्ह्याचे पालकत्व शरद पवार यांनी स्वीकारले. यशवंतराव चव्हाण यांना गुरुस्थानी मानून जिल्हाच्या विकासात योगदान देत राहिले. या गोष्टीचा सद्या शशिकांत शिंदे यांना निवडणुकीमध्ये फायदा होईल. जिल्ह्यातील बहुतेक ज्येष्ठ नागरिक,तरुण हे शरद पवारांना मानतात. शरद पवार हे देशाचे नेते आहेत त्यामुळे इथली जनता कायम त्यांच्या पाठीमागे उभी राहते. याचा फायदा यावेळी शशिकांत शिंदेला मिळणार हे मात्र नक्की.मागील निवडणुकीत शरद पवारांचा जिल्हा याच टॅगलाईन खाली संपूर्ण जिल्हा श्रीनिवास पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिला होता. याचा फटका यंदाही उदयनराजे भोसले यांना बसण्याची शक्यता आहे.

विधानसभेतील पक्षीय बलाबल

आता आपण सातारा जिल्ह्यातील विधानसभा पक्षनिहाय बलाबल पाहुयात … कराड उत्तर, कराड दक्षिण हे दोन मतदारसंघ सध्या आघाडीकडे आहेत. म्हणजेच एक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे व एक काँग्रेसकडे.कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आहेत व कराड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. या दोन्ही मतदारसंघातून मागच्या लोकसभेला व विधानसभेला प्रचंड बहुमत हे आघाडीच्या उमेदवाराला मिळालं होतं. त्यामुळे हे मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत कायम शरद पवारांच्या पाठीमागे राहतात. शशिकांत शिंदेंना विजयी व्हायचं असेल तर या दोन मतदारसंघातच त्यांना विक्रमी मताधिक्य घ्यावे लागेल तेव्हाच त्यांचा विजय नक्की समजला जातोय.

तिसरा विधानसभा मतदारसंघ हा पाटण ….. पाटणमध्ये सध्या शंभूराजे देसाई हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत. मागील लोकसभेला या भागातील जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांच्या पाठीमागे उभी राहिली होती. मात्र यावेळी श्रीनिवास पाटील उमेदवार नसल्याने पाटणची जनता उदयन महाराजांना साथ देईल असं बोललं जात आहे. पाटण भागातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात यावर अनेक बाबी अवलंबून आहेत.

चौथा महत्त्वाचा मतदारसंघ वाई खंडाळा … वाईला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील आहेत. हे पूर्वीपासून शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. पण मधल्या काळातील राष्ट्रवादीच्या फुटिमुळे मकरंद पाटील हे अजित पवार गटात गेलेले आहेत. पण ते युतीचे उमेदवार असलेले उदयनराजेचा प्रचार करतील अशी शक्यता सध्या वाटत नाहीत. कारण स्वतः मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण ही लोकसभा निवडणुकीची जागा भाजपकडे गेल्याने नितीन पाटील यांचा हिरमोड झालेला दिसतोय. तसेच मकरंद पाटील व उदयनराजे यांच्यातील वैमनस्यलक्षात घेता उदयनराजेंना त्यांची फारशी मदत होईल असे वाटत नाही.

पाचवा मतदारसंघ सातारा जावळी… या मतदारसंघात उदयनराजेंचे बंधू शिवेंद्रराजे भोसले सध्याचे भाजपचे आमदार आहेत. यावेळी दोन्ही कुटुंबांचे मनोमिलन झाल्यामुळे मोठ्या ताकतीने मदत करतील अशी शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना 50 हजार इतके मताधिक्य मिळाले होते. हा मतदारसंघ उदयनराजेसाठी पॉझिटिव्ह आहे. सातारा जावळी परिसरात उदयन महाराज यांनी विकासाचे मोठे कामे केले आहे. त्याचाही परिणाम म्हणून त्यांना या दोन तालुक्यात चांगलंच मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा उदयनराजे ठेऊन असतील.

सहावा मतदारसंघ कोरेगाव … स्वतः शशिकांत शिंदे या भागातील उमेदवार असल्याने त्यांना फायदा होईल हे मात्र नक्की. शिंदे यांनी कोरेगाव विधानसभेचे दोन वेळेस प्रतिनिधित्व केलेले आहे. तसेच मागील विधानसभा निवडणुकीत फक्त काही हजार मतांनी त्यांचा पराभव झालेला होता. पराभव झालेला असतानाही शरद पवार यांनी त्यांना परत विधान परिषदेत संधी देऊन त्यांच्यावर विश्वास दर्शवला होता. विधान परिषदेत अतिशय उत्तम कामगिरी केल्याने त्यांना यावेळेस राष्ट्रवादीकडून सातारा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे यांना कोरेगाव मधून लोकसभा निवडणुकीत चांगलं विक्रमी लीड मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आता सर्वात शेवटी समजून घेऊ कि खरा गेमचॅजर कोणता फॅक्टर ठरणार ते. बारकाईनं सातारा लोकसभेच डिकोडिंग केल्यानंतर लक्षात येतं कि कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या विधानसभा क्षेत्रातील मतदारच खासदार कोण हे ठरवत असतात. आजवर स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी इथले मतदार उभे राहिल्याचं अनेक निवडणुकांतून दिसून आलंय. मागील निवडणुकीत हृदयात उदयनराजे, मनात भाजप मात्र मत श्रीनिवास पाटील यांना असं अनेकांचं झाल्याचं पाहायला मिळालं. यंदा मात्र असंच होईल याची शाश्वती अजिबात नाही. एकवेळ कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारात लीड घेण्याने माविआ उमेदवाराला लीड मिळू शकते परंतु पाटण आणि कराड उत्तर मध्ये मात्र तुर्तास तशी शक्यता कमी जाणवत आहे. पाटण मधेय उदयनराजेंना मानणारा मोठा वर्ग असून यंदा स्थानिक उमेदवार रिंगणात नसल्याने आणि शंभूराज देसाई यांच्या रेट्याने उदयनराजे इथे लीड घेऊ शकतात असं दिसतंय. बाकी सातारा, कोरेगाव, वाई येथे कोटोकी टक्कर पाहायला मिळेल. मात्र पाटण, सातारा शहर, जावळी भागात उदयनराजेंना मिळणार लीड भरून काढण्यासाठी शशिकांत शिंदेंना काहीतरी सर्जिकल स्ट्राईक करावा लागणारे हे उघड आहे. बाकी साताऱ्यात यंदा फाईट अगदीच जोरात होणारेय हे नक्की. तुम्हाला काय वाटतं साताऱ्याचा पुढचा खासदार कोण होईल हे आम्हाला कमेंट करून सांगा