साताऱ्यातील पराभवानंतर शशिकांत शिंदेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; पवारांचा उल्लेख करत म्हंटल की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीत (Satara Lok Sabha 2024 Results) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या छत्रपती उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी तब्बल ३२७७१ मतांनी शशिकांत शिंदेचा पराभव केला. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीने तब्बल ३० जागा जिंकल्या तर दुसरीकडे साताऱ्याची हक्काची जागा हरल्याने, गड आला पण सिंह गेला अशी भावना शरद पवारांच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली होती . या पराभवनंतर शशिकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत आपण हार मानणार नाही अशी गर्जना केली आहे.

शशिकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हंटल, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही! सातारा लोकसभा निवडणुकीत झालेला निसटता पराभव मी खिलाडूवृत्तीने स्वीकारतो. शरदचंद्रजी पवार साहेबांचा शिलेदार म्हणून ही निवडणूक लढायला मी तयार झालो. झालेल्या पराभवाचे नक्कीच आत्मपरीक्षण करू. अनेक वेळा जय-पराजयाचे प्रसंग येत असतात. सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेचे मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. गेले अनेक दिवस महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जीवाचे रान करत प्रचार करत होते. यापुढील काळात देखील माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आणि समस्त सातारच्या जनतेच्या मी ऋणात राहील!

दरम्यान, निकालापूर्वीच्या सर्वच एक्झिट पोल मध्ये शशिकांत शिंदे याना आघाडी दाखवण्यात आली होती, मात्र अखेरच्या क्षणी उदयनराजेंनी ३२७७१ हजारांचे लीड घेत शशिकांत शिंदे याना पराभवाचा धक्का दिला. कराड दक्षिण आणि कराड उत्तर मधून जितकं लीड अपेक्षित होत तितकं लीड शशिकांत शिंदे याना न मिळाल्याचा फटका बसला. तसेच होमपीच असलेल्या कोरेगावात सुद्धा शशिकांत शिंदे याना आघाडी घेता आली नाही. तर अपक्ष उमेदवाराचे चिन्ह पिपाणी असल्याने अनेकांनी तुतारी समजून पिपाणीला मतदान केल्याचे निकालाच्या आकडेवारी वरून दिसलं.