पत्रकार शशिकांत वारिशेंचा अपघात जाणीवपूर्वक घडवला; सरकारचे लेखी उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघात जाणूनबुजून घडवण्यात आला अशी कबुली राज्य सरकारने दिली आहे. यापूर्वीच विरोधकांनी वारिशे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. आज विधानपरिषदेत राज्य सरकारने आपल्या लेखी उत्तरात हा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आला अस कबूल केलं आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी सुरु असल्याची देखील माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली आहे.

शशिकांत वारिसे हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ‘महानगरी टाईम्स’ या वृत्तपत्राचे पत्रकार होते. 7 फेब्रुवारी रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. राजापूर येथील पेट्रोल पंपावर ‘थार’ गाडीनं शशिकांत वारिसे यांच्या दुचाकी वाहनाला जोरात धडक दिली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली असून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शशिकांत वारिसे यांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे अशी शंका राज्यातील विरोधी पक्षाने उपस्थित केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वारीशे यांच्या मृत्यूवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. अखेर सरकारनेच या अपघाताबाबत उत्तर देताना शशिकांत वारिशे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणला, असं म्हंटल आहे.