Sheikh Hasina Resign : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा; देश सोडून भारतात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांग्लादेशमधून एक मोठी घडामोड समोर येत आहे. बांगलादेश मध्ये मोठी अराजकता माजली असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina Resign) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. एवढच नव्हे तर शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. बांगलादेशातील वादग्रस्त कोटा प्रणालीवरून ढाका विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्त्यांची पोलिस आणि सरकार समर्थक निदर्शकांशी हिंसक झटापट झाली होती तेव्हापासूनच बांगलादेश मध्ये अराजकारता पसरायला सुरूवात झाली होती. आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून लष्कर संपूर्ण देशाची सत्ता हातात घेण्याची शक्यता आहे.

हजारो आंदोलक रस्त्यावर –

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेश मध्ये मोठं आंदोलन सुरु आहे. सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला, मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी सुद्धा शेख हसिना यांना जनतेच्या भावना लक्षात घेऊन राजीनामा देण्यास सांगितले आहे. यानंतर शेख हसीना यांनी आज राजीनामा देत देशातून पळ काढला आहे. बांगलादेश मध्ये जाळपोळ आणि हिंसाचाराने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेटदेखील बंद करण्यात आलं आहे. ढाका शहरात हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या एकूण सर्व परिस्थितीमुळे पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर देश सोडण्याची वेळ आली आहे. हसीना या भारतात दाखल झाल्यात अशाही बातम्या समोर येत आहेत.

अस्थिरतेचे नेमके कारण काय?

शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये अराजकता माजली आहे . 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते. मात्र आरक्षणाचा मुद्दा तापल्याने देशातील संपूर्ण वातावरण बिघडलं आणि हिंसाचार, जाळपोळीच्या घटनांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांना देश सोडण्याची वेळ आली.