शेखर चरेगांवकर यांची दि यशवंत को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदावरुन हकालपट्टी; सहकार आयुक्तांची मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Shekhar Charegaonkar : सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची यशवंत को ऑपरेटिक बँक लि. फलटण जि.सातारा (Yashwant Cooperative Bank) या बँकेच्या संचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ५ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी केल्याने शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था. महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदर कारवाई केली आहे. चरेगांवकर हे आदेशाच्या दिनांकापासून समितीच्या पुढील पाच वर्षाच्या मुदतीचा कालावधी समाप्त होईपर्यंत समितीचा सदस्य म्हणून पुन्हा नेमणूक केली जाण्यास पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास, पुन्हा स्वीकृत होण्यास, किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाही असे आदेशात म्हटले आहे.

यशवंत को ऑपरेटिक बँक लि. फलटण जि.सातारा या बँकेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि त्याखालील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 या मधील तरतूदीनुसार झालेली आहे. श्री.संजीव दत्तात्रय कुलकर्णी, समासद, दि यशवंत को-ऑप.बँक लि., फलटण यांनी त्यांचेकडील तक्रार अर्ज दिनांक 17/01/2023 अन्वये या कार्यालयाकडे तक्रार केली आहे की, श्री.शेखर सुरेश चरेगावकर हे सातारा जिल्ह्यातील यशवंत को. ऑप. बँक लि. फलटण या बँकेचे अध्यक्ष आहेत. श्री. चरेगावकर यांचेविरुद्ध दि वाई अर्बन को-ऑप. बँक लि. वाई यांनी कलम 101 अन्वये रुपये 5,45,09,973/- रकमेचे प्रमाणपत्र दिनांक 9/12/2022 रोजी प्राप्त केले आहे. तरी कलम 73 कअ मधील तरतुदीनुसार श्री चरेगावकर हे परतफेड कसुरदार/डिफॉल्टर ठरत असल्याने त्यांचे दि यशवंत को-ऑप.बँक लि. फलटण या सहकारी बँकेतील अध्यक्षपद निरस्त करण्यात यावे व अनुषंगिक योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती अर्जदार यांनी केली होती.

त्यानुसार दि वाई अर्बन को. ऑप. बँक लि. वाई या बँकेकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी, दि. वाई अर्बन को- ऑप. बँक लि., वाई यांनी त्यांचेकडील पत्र दिनांक 20/03/2023 अन्वये अहवाल या कार्यालयास सादर केला आहे. त्यानुसार चरेगांवकर हे दि वाई अर्बन को. ऑप. बँक लि., वाई या बँकेचे थकीत कर्जदार असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८अ (१) (व) मधील तरतुदी लागू होत असलेमुळे श्री. शेखर चरेगांवकर यांना उक्त बँकेचे संचालक पदावरून दूर का करण्यात येवु नये? याबाबत म्हणणे मांडण्याकरिता या कार्यालयाची कारणे दाखवा नोटिस दिनांक २१/०४/२०२३ ची सर्व संबंधीतांवर बजावणी करून सर्व संबंधीतांना वेळोवेळीच्या सुनावणीमध्ये म्हणणे मांडणे/ युक्तीवाद करणेची पुरेशी व वाजवी संधी देण्यात आली. दिनांक २/५/२०२३, २९/०५/२०२३, १९/०६/२०२३, ०३/०७/२०२३ व दिनांक २४/०७/२०२३ रोजी सुनावणीचे कामकाज करण्यात आले. Shekhar Charegaonkar

उक्त दिनांकापैकी केवळ दिनांक २९/०५/२०२३ रोजी श्री. शेखर चरेगावकर हे उपस्थित होते. सदर दिनांकास त्यांना संबंधीत कागदपत्रे मिळणे व म्हणणे मांडपोसाठी पुढील तारीख मिळावी, अशी विनंती केली. त्यानुसार या कार्यालयाकडील पत्र दिनांक ०५/०६/२०२३ अन्वये अँड. डी. बी. पाटील तर्फे श्री. शेखर चरेगावकर यांना सदर प्रकरणाच्या सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती दिनांक ०५/०६/२०२३ रोजी समक्ष देण्यात आल्या आहेत. त्यानंतर वेळोवेळी दिनांक १९/६/२०२३, ०३/०७/२०२३ व २४/०७/२०२३ रोजी सुनावणीची पुरेशी संधी देण्यात आली. तथापि सदर दिनांकास ते गैरहजर होते. तसेच त्यांनी प्रत्येक सुनावणीचे वेळी पुढील तारीख मिळावी, अशी लेखी मागणी केली आहे. सुनावणीचे दिनांकास अथवा त्यानंतर केव्हाही त्यांनी सदर प्रकरणी त्यांचे कोणतेही मौखिक अथवा लेखी म्हणणे सादर केलेले नाही. या बाबत दि यशवंत को-ऑप. बँक लि., फलटण यांनी कोणतेही म्हणणे सादर केलेले नाही.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८अ (१) मधील तरतुदीनुसार उक्त बँकेच्या संघीय संस्था असलेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँकस फेडरेशन मुंबई यांना प्रस्तुत प्रकरणाबाबतची नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे सादर करण्यास कळविण्यात आले होते. त्यानुसार त्यांचेकडील पत्र दिनांक १७/०६/२०२३ चे पत्रा अन्वये कळविण्यात आले आहे की, सुनावणीचे वेळी अर्जदार व प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून प्रस्तुत प्रकरणी कायदा व उपविधीतील तरतुदीनुसार यथोचित निर्णय घ्यावा.

सदर प्रकरणी तक्रारदार श्री. संजीव दत्तात्रय कुलकर्णी यांचे कडील अर्ज दिनांक २७/०२/२०२३ मुख्य कार्यकारी दि वाई अर्बन को-ऑप बँक लि., वाई जि.सातारा यांचेकडील दिनांक २०/०३/२०२३ रोजीचा अहवाल, सर्व संबंधीतांनी दाखल केलेले कागदपत्रे मांडलेले म्हणणे/ युक्तीवाद, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७३ कञ आणि ७८अ. यांतील तरतुदीचा विचार करता पुढिलप्रमाणे निरीक्षण व निष्कर्ष नोंदविण्यात येत आहेत.

निरीक्षण व निष्कर्ष :

जि. सातारा यांचेकडून अहवाल मागविण्यात आला होता. श्री. शेखर चरेगांवकर हे दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि., फलटण जि.सातारा या बँकेचे अध्यक्ष आहेत. तक्रारदार श्री. संजीव दत्तात्रय कुलकर्णी यांनी त्यांचेकडील दिनांक १७/०१/२०२३ चे तक्रार अर्जान्वये श्री. शेखर चरेगांवकर हे दि वाई अर्बन को-ऑप बँक लि., वाई जि.सातारा या बँकेचे थकबाकीदार आहेत. असे या कार्यालयास कळविले आहे. त्यानुसार या कार्यालयाकडून दिनांक ०९/०३/२०२३ चे पत्राने दि वाई अर्बन को-ऑप. बँक लि., वाई महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला होता.

मुख्य कार्यकारी अधिकारी, दि वार्ड अर्बन को-ऑप. बँक लि., वाई जि.सातारा यांचे पत्र दिनांक २०/०३/२०२३ अन्वये सदर प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाला असून असे नमूद केले आहे की, दि बाई अर्बन को-ऑप. बँक लि. वाई या बँकेने श्री.शेखर सुरेश चरेगावकर व इतर सहकर्जदार यांना दिनांक १७/३/२०१८ रोजी १३.५% दराने १२० महिने मुदतीसाठी रुपये ६ कोटी इतके टर्म लोन मंजूर केले आहे. सदर कर्जासाठी रुपये ९.२८ कोटी मुल्यांकनाचे तारण घेतले आहे. कर्जाचे वितरण दिनांक २१/३/२०१८ रोजी झाले असून आजअखेर येणेवाको रुपये ५.३०,१६,५२२/- इतकी असून थकबाकी रु.१,०५,८८,५६८/- (थकहप्ते १२) इतकी आहे. श्री. शेखर चरेगांवकर यांचे कर्ज खाते थकबाकी होऊन एनपीए मध्ये गेलेनंतर वसुलीसाठी बँकेने कलम १०१ अन्वये दिनांक ०९/१२/२०२२ रोजी रुपये ५,४५,०९,९७३/- रकमेचा वसुली दाखला प्राप्त केलेला आहे व कलम १५६ नुसार सदर खात्यावर पुढील कारवाई प्रक्रीया सुरू आहे.

खुलाशावरून श्री. शेखर चरेगांवकर हे दि याई अर्बन को-ऑप. बँक लि., बाई या बँकेचे वत कर्जदार असल्याचे सकृतदर्शनी दिसून आल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० से. कलम ७३कअ नुसार निरहंता ओढविली असल्याने व कलम ७८१) अन्वये या कार्यालयाकडून खर चरेगावकर यांना दिनांक २१/०४/२०२३ रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. vi. सदरची नोटीस सर्व संबंधीतांना R.P.A.D. पोस्टोनच e-mail अन्वये पाठविण्यात आली होती. vii. त्यानुसार वेळोवेळी झालेल्या सुनावणीमध्ये श्री. शेखर चरेगावकर यांनी सदर प्रकरणी त्यांच कोणतेही मौखिक अथवा लेखी म्हणणे मुदतीत सादर केलेले नाही. अथवा त्यांनी केव्हाही ते दि खाई अर्बन को- ऑप. बँक लि. वाई जि. सातारा या बँकेचे थकबाकीदार असल्याचे नाकारलेले नाही. याचा अर्थ से सदर बँकेचे थकबाकीदार असल्याचे त्यांना मान्य आहे असा होतो.

दि वार्ड अर्बन को-ऑप. बँक लि. वाई जि. सातारा यांनी दिलेल्या अहवालानुसार श्री. शेखर चरेगावकर हे दि वाई अर्बन को-ऑप.जक लि… वाई या बँकेचे थकीत कर्जदार असून सदर बँकेने त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला प्राप्त केला आहे. श्री. शेखर चरेगावकर हे थकबाकीदार असल्याचे सिद्ध होत आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कञ(२) (एक) (ड) मधील तरतुदीनुसार बिगर कृषी पत संस्थेच्या बाबतीत देण्यात आलेल्या कर्जाचा कोणताही हाता फेडण्यास ज्याने कसूर केली असेल असा सदस्य, कसुरदार सदस्य ठरतात परिणामी उक्त अधिनियमाचे कलम ७३ क (१) मधील तरतुदीनुसार कोणत्याही संस्थेच्या समितीचा सदस्यपदी निवडून येण्यास किंवा सदस्य म्हणून राहण्यास पात्र असणार नाही.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कजर) (एक)(ड) मधील तरतूदीनुसार विगर कृषी पत संस्थेच्या बाबतीत देण्यात आलेल्या कर्जाचा कोणताही हप्ता फेडण्यास ज्याने कसूर केली असेल असा सदस्य, कसुरदार सदस्य ठरतात परिणामी उक्त अधिनियमाचे कलम ७३ क (१) मधील तरतुदीनुसार कोणत्याही संस्थेच्या समितीचा सदस्यपदी निवडून येण्यास किंवा सदस्य म्हणून राहण्यास पात्र असणार नाही.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८२(१) मधील तरतुदीनुसार समितीस निष्प्रभावित करण्याचा किया तिच्या सदस्यांना काढून टाकणे बाबत तरतूद आहे. त्यानुसार समितीचा सदस्य म्हणून राहण्यास निरह झाला असेल तेथे ७८(२) मध्ये तरतुद केल्याप्रमाणे लेखी निवेदन करण्याची वाजवी संधी दिल्यानंतर आणि त्याबाबत म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर व ती संस्था जिच्याशी संलग्न असेल त्या संघीय संस्थेशी विचारविनिमय केल्यानंतर नोटीशीव्दारे नमूद केलेले दोषारोप सिध्द झाले आहेत या निष्कर्षाप्रत आला असेल तर, त्याबाबतची कारणे नमूद करून आदेशाव्दारे सदस्याला काढून टाकू शकेल.

उपरोक्त परिच्छेदांवरुन कारणे दाखवा नोटिस दिनांक २१/०४/२०२३ मधे नमूद केले नुसार दि यशवंत को ऑप. बँक लि., फलटण जि. सातारा या बँकेचे अध्यक्ष श्री. शेखर चरेगांवकर हे दि खाई अर्बन को. ऑप. बँक लि. वाई जि.सातारा या बँकेचे थकबाकीदार असलेबाबतचा दोषारोप सिध्द होत आहे. 3. उपरोक्त परिच्छेदावरुन श्री. शेखर चरेगावकर हे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६२ चे कलम ७३ क.अ. ((२) मधील तरतुदीनुसार निरहंता ओढवली असल्याने त्यांना दि यशवंत को ऑपरेटिव्ह बँक लि.. फलटण जि.सातारा या बँकेच्या संचालक पदावरून दूर करणे आवश्यक झाले आहे. अशी माझी खात्री झाली आहे. खालील प्रमाणे आदेश देत आहे.

आदेश –

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८अ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मो. शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आदेश देतो की. श्री. शेखर चरेगांवकर यांना या आदेशाच्या दिनांकापासून दि यशवंत को ऑपरेटिव्ह बँक लि. फलटण जि.सातारा या बँकेच्या संचालक पदावरुन दूर केले आहे.

तसेच उक्त अधिनियमाचे कलम ७३(३) अन्वये श्री. शेखर चरेगांवकर हे या आदेशाच्या दिनांकापसून समितीच्या पुढील पाच वर्षाच्या मुदतीचा कालावधी समाप्त होईपर्यंत समितीचा सदस्य म्हणून पुन्हा नेमणूक केली जाण्यास पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास, पुन्हा स्वीकृत होण्यास, किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाही. सदर आदेश आज दिनांक ०२/०८/२०२३ रोजी माझे सही शिक्केनिशी व कार्यालयौन मुद्रनिशी दिला आहे.