“होय, केली मी गद्दारी, पण…”; गुलाबराव पाटलांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली.” असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

गुलाबराव पाटील यांनी आज जळगावातील बिलखेडा येथील भूमिपूजन कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यक्रमातील उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, होय, मी गद्दारी केली आहे. विरोधाला विरोध करायचा पण मतदारसंघात काही काम करायचे नाही. बिलखेडेत साधी एक मुतारी हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात,”

महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पडल्यानंतर त्यांच्यावर बंडखोर आणि गद्दार असे म्हणत टीका केली जात आहे. तसेच शिवसेनेतील ४० आणि शिवसेनेच्या समर्थनात असणाऱ्या 10 आमदारांनाबंडखोर असे हिनवले जात आहे. यावर मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.