गुवाहाटीत एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेला? शिंदे गटाच्या आमदारांवर सनसनाटी आरोप

shinde group MLA
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत गुवाहाटी गाठली होती. मात्र याच गुवाहाटीच्या हॉटेल मध्ये शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदारांनी एअर होस्टेसचा विनयभंग केल्याचा खळबळजनक आरोप प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला आहे. धाराशिव (Dharashiv) येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो या कार्यक्रमात बोलतांना सरोदे (Asim Sarode) यांनी हा आरोप केला आहे. तसेच एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेला?? असा सवाल करत सरोदे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

आपल्या भाषणात बोलताना असीम सरोदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे आमदारांना घेऊन गेल्यानंतर त्यांच्यातील 2 आमदाराना मारहाण करण्यात आली होती. तसेच, स्पाईस जेट व इंडिगो या विमान कंपनीच्या महिला एअर होस्ट यांचा शिंदे सेनेतील आमदारांनी विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीच्या ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमध्ये इतर कोणत्याही ग्राहकांना परवानगी नव्हती. परंतु, स्पाईस जेट व इंडिगो या कंपनीकडून आधीपासूनच या हॉटेलमध्ये काही रूम बुक करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे हॉटेलच्या वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. त्या हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेला?? असा संतप्त सवाल असीम सरोदे यांनी केला.

एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला हे महाराष्ट्राने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग यांचे खरे चारित्र्य आपल्यासमोर येईल असा दावा असीम सरोदे यांनी केला. दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या-मोठ्या मंत्री पदावर बसले असले, तरीही या पैश्याचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही,” असे म्हणत असीम सरोदे यांनी शिंदे गटावर थेट टीका केली आहे .