शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात अनेक लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. यातच शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पुढे जाऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवले तर शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल, अशी सूत्रे भाजपकडून ठरवली गेली आहे. त्यामुळे शिंदे गट पूर्णपणे भाजपच्या बाजूने होईल. याचाच फायदा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत देखील होईल.

सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच शिवसेनेच्या 16 आमदार आपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली आहे. या सुनावणीत दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. लवकरच आता या प्रकरणाचा निकाल देखील समोर येईल. मुख्य म्हणजे, या निकालामध्ये राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरविले तर त्यासाठी भाजपने पुढील रणनीती आखली आहे.

भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार, विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास किंवा शिंदे गटाकडे असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठल्यास एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिंदे गटातील सर्व आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील. मात्र अद्याप याबाबत भाजपच्या कोणत्याही नेत्यांकडून खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यास उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाऊन दाद मागू शकतात. त्यामुळे सध्या राहुल नार्वेकर यांच्या निकालावरच सर्वांचे लक्ष लागले आहे.