शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार? चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील ३ महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरामध्ये जो विषय सर्वाधिक चर्चेत आला त्या गुवाहाटीला शिंदे गट पुन्हा एकदा जाणार आहे अशा बातम्या समोर येत आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदार गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत.

या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी काही पदाधिकारी गुवाहटीला गेल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी काही पदाधिकारी गुवाहाटीला गेल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गटाच्या काही आमदारांना देखील जबाबदारी देण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला जातील.

दरम्यान, राज्यातील सरकारचा पाठिंबा काढण्याच्या वेळी शिंदे गट सुरत मार्गे गुवाहाटीला गेला होता. त्यावेळी याची खूप चर्चाही झाली. शिंदे गटाचे आमदार शाहजी पाटील यांचा आम्ही सध्या गुवाहाटीत आहोत, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल हा डायलॉगही तेव्हा खूप गाजला होता. आता पुन्हा एकदा शिंदे गट गुवाहाटीला जाणार असल्याने पुन्हा एकदा हॉटेल, झाडी आणि डोंगराचा विषय चर्चेत येणार हे नक्की..