ठाकरे गटाला नवं नाव मिळताच किशोरी पेडणेकरांचे गाण्यातून शिंदे गटाला खुलं चॅलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी घातली. यानंतर काल निवडणूक आयोगाने उद्धव गट (uddhav thackeray camp) आणि ठाकरे गट या दोन्ही गटाला वेगवेगळी नावं दिली आहेत, तर ठाकरे गटाला (uddhav thackeray camp) निवडणुकीसाठी नवीन चिन्हसुद्धा दिले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला (uddhav thackeray camp) शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. तसेच ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे.

किशोरी पेडणेकरांनी गाण्यातून साधला निशाणा
ठाकरे गटाला (uddhav thackeray camp) नवीन चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गाण्याच्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ‘काळरात्र होता होता, उषःकाल झाला, अरे पुन्हा शिवसैनिकांनो, पेटवा मशाली’, असे गाणे म्हणत शिंदे गटाला खुलं चॅलेंज दिले आहे.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर
‘आपल्याला निवडणूक आयोगाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव मिळालं. पहिली लढाई खरी जिंकली. ज्यांनी आपल्या पक्षात काळरात्र करण्याचं ठरवलं तो उष:काल आतापासून सुरू झाला आहे. आयुष्याच्या मशाली पेटवा आणि दाखवा, ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे (uddhav thackeray camp) यांची मशाल आहे’, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी शिवसैनिकांना केले आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!