राज्यातील सत्तासंघर्षांवरील पुढील सुनावणी दिवाळी नंतर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सत्तासंघर्षवरील पुढील सुनावणी 1 नोव्हेंबरला होणार आहे. मंगळवारीच या संपूर्ण प्रकरणावर दिवसभर मॅरेथॉन सुनावणी पार पडली मात्र आता पुढील सुनावणी साठी महिनाभर वाट पहावी लागणार आहे. 1 नोव्हेंबर ला याप्रकरणी सुनावणी होणार असून 16 आमदारांच्या अपात्रतेसह अनेक विषयांवर चर्चा होईल.

पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सत्तासंघर्ष सुनावणी सुरु आहे. 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, राज्यपालांनी नव्या सरकारच्या शपथविधीला दिलेली मान्यता, मुख्य प्रदोत पदी नेमकं कोण ?? अशा विविध याचिकांवरील सुनावणी अद्यापही प्रलंबित आहे. त्यातच आता तब्बल 1 महिना ही सुनावणी पुढे ढकलल्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या भवितव्याचा फैसला अजून लांबणीवर पडणार आहे.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. शिवसेना कोणाची याबाबत निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकत अशा सूचना कोर्टाने दिल्या. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे सुनावणी लांबणीवर पडली असताना दुसरीकडे निवडणूक आयोग याकालावधीमध्ये नेमकी काय भूमिका घेत हे पाहावे लागेल.