Shirdi International Airport : शिर्डी विमानतळावर जप्तीची टांगती तलवार ? नेमकं काय आहे प्रकरण ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Shirdi International Airport : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे तीर्थक्षेत्र देश विदेशात प्रसिद्ध आहे. देश विदेशातून येथे लोक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. म्हणूनच येथील बस स्थानक , रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात आला. शिवाय येथे विमानतळ सुद्धा बांधण्यात आले मात्र आता या विमानतळावर जप्तीची टांगती तलवार आहे ? याचे कारण काय ? जप्तीची नोटीस कोणाकडून पाठवण्यात आली आहे ? नेमके हे (Shirdi International Airport) काय प्रकरण आहे जाणून घेऊया …

आठ कोटी तीस लाखांचा कर थकवल्या प्रकरणी शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस शिर्डी ग्रामपंचायतीकडून बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही नोटीस बजावल्यामुळे एकच खळबळ (Shirdi International Airport) उडाली आहे.

काय आहे प्रकरण? (Shirdi International Airport)

शिर्डी विमानतळ हे कोपरगाव तालुक्यातल्या काकडी- मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येते. विमानतळ प्राधिकरणाने काकडी ग्रामपंचायतचा आठ कोटी 30 लाखांचा कर थकवलाय. त्यामुळे ग्रामपंचायतींना शिर्डी विमानतळ प्रशासनाला जंगम मालमत्ता जप्तीचं वॉरंट बजावले. 2017 पासून विमानतळ प्रशासनाकडून विविध स्वरूपातील कर थकीत आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही (Shirdi International Airport) थकबाकी जमा होत नाही आणि याच कारणामुळे ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे.

काय आहे ग्रामपंचायतीचे म्हणणे? (Shirdi International Airport)

शिर्डी विमानतळाची उभारणी करत असताना गावातल्या हजारो हेक्टर जमिनींचं भूसंपादन करण्यात आलं होतं. त्यावेळी काकडी गावात पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासासाठी निधी देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य विमानतळ व विकास प्राधिकरणाकडून देण्यात आलं होतं. मात्र या सर्व आश्वासनांची पूर्तता झालीच नाही. त्यातच ग्रामपंचायतीच्या आठ कोटी 30 लाखांचा कर प्राधिकरणाने थकवला आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला देखील अडथळे निर्माण होत आहेत म्हणूनच ग्रामपंचायतीकडून नोटीस बजावण्यात (Shirdi International Airport) आली आहे.

कशावर येणार जप्ती? (Shirdi International Airport)

विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग , पेट्रोल पंप, एटीसी टॉवरसह मालमत्ता जप्तीचे वॉरंट ग्रामपंचायतीने बजावले आहे. कर जमा न केल्यामुळे आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून जंगम मालमत्ता जप्त करणार असल्याचा इशारा सरपंच पूर्वी गुंजाळ आणि उपसरपंच (Shirdi International Airport) भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.