खळबळजनक ! शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Shirdi Saibaba Temple Threat : जगप्रसिद्ध साईबाबा समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धक्कादायक धमकी एका अज्ञात ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. ही धमकी मिळताच मंदिर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, शिर्डी परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ही घटना जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर समोर आल्यामुळे, याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. देशात सध्या सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर असताना, अशा प्रकारच्या धमक्या चिंतेचा विषय (Shirdi Saibaba Temple Threat) बनत आहेत.

सकाळी ई-मेलने धमकी (Shirdi Saibaba Temple Threat)

शनिवारी (३ मे) सकाळी शिर्डी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांना एक ई-मेल प्राप्त झाला, ज्यामध्ये मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली गेली. ई-मेलचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाही. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. ई-मेल खरा आहे की खोटा, याचा तपास सध्या सुरू असून, सायबर क्राइम शाखेसह विशेष तपास पथकही यामध्ये सहभागी आहे.

यापूर्वीही आल्या होत्या धमक्या (Shirdi Saibaba Temple Threat)

शिर्डी साईबाबा संस्थानला यापूर्वीही वेगवेगळ्या स्वरूपातील धमक्या मिळाल्या होत्या. त्यावेळी या धमक्या खोट्या ठरल्या होत्या. मात्र, सध्याच्या दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी फार गंभीर स्वरूपाची मानली जात आहे. साईभक्तांची सुरक्षितता लक्षात घेता, कोणतीही जोखीम न पत्करता प्रशासनाने तातडीने कडेकोट बंदोबस्त लागू केला आहे.

मंदिर परिसरात चोख सुरक्षा (Shirdi Saibaba Temple Threat)

धमकी मिळाल्यानंतर शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स दाखल करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही फुटेजची चौकशी सुरू असून, बॉम्ब शोध पथक (Bomb Detection and Disposal Squad – BDDS), श्वानपथक आणि तातडीच्या कृती पथकाला (QRT) अलर्ट ठेवण्यात आले आहे. तसेच, मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांची तपासणी अधिक काटेकोरपणे केली जात आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत वाढलेलं महत्त्व

या धमकीच्या एक दिवस आधीच केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील शिर्डी दौऱ्यावर होते. त्यांनी मंदिरात दर्शन घेतले आणि माध्यमांशी संवाद साधताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल, असं सूचित करत “आता फक्त ॲक्शन पाहा… ॲक्शन!” असं विधान केलं. त्यांच्या उपस्थितीत गोदावरी कालव्याच्या कामाचाही शुभारंभ झाला. त्यांनी पहलगाम घटनेचा बदला घेतल्याशिवाय सत्कार (Shirdi Saibaba Temple Threat) स्वीकारणार नसल्याचा संकल्पही बोलून दाखवला.

राज्य सरकारची व्यस्तता आणि वाढलेली जबाबदारी

दरम्यान, ६ मे रोजी चौंडी (ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे. ही ऐतिहासिक बैठक ग्रामीण भागात होत असून, संपूर्ण राज्य प्रशासन त्याच्या तयारीत व्यस्त आहे. अशावेळी शिर्डीसारख्या महत्वाच्या धार्मिक स्थळाला धमकी मिळाल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे.

सध्या संपूर्ण शिर्डीमध्ये सतर्कतेचं वातावरण आहे. मंदिर प्रशासन, स्थानिक पोलिस आणि राज्य सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अलर्टवर असून, प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भाविकांनी घाबरून न जाता अफवांपासून सावध राहावे आणि पोलिस प्रशासनास (Shirdi Saibaba Temple Threat) सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.