भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात! दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगरमधील राहता तालुक्यात एक भीषण अपघात (truck accident) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात (truck accident) झाला आहे. हि धडक एवढी भीषण होती कि या अपघातात (truck accident) ट्रकच्या समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. तसेच ट्रकमध्ये असलेल्या दोन्ही ट्रकचालकांचा जागीच मृत्यू झाला.

कसा घडला अपघात?
अहमदनगरमधील राहता तालुक्यातील लोणी-कोल्हार मार्गावर दोन मालवाहू ट्रकची जबरदस्त धडक (truck accident) झाली. समोरासमोर धडक झाल्यामुळे या दोन्ही ट्रकच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. हि धडक एवढी भीषण होती कि, मालवाहू ट्रकच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष राख आणि सुनील जायभाये अशी मृत्यू झालेल्या चालकांची नावं आहेत.

या भीषण अपघाताची (truck accident) माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. यानंतर क्रेनच्या साहाय्याने या दोन्ही ट्रकला बाजूला हटवण्यात आले. आणि विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या अपघाताची पोलिसांनी नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय