शिवदौलत नोकरी मेळाव्यात 273 उमेदवारांना थेट निवडपत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पाटण विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींनाही नोकरीचा संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शिवदौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन केले होते. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून दौलतनगर येथे शिवदौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन केले होते. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या मेळाव्याला सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींनी दिलेला प्रतिसाद मिळाला. यापुढे प्रतिवर्षी युवक-युवतींसाठी नोकरी महामेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

या नोकरी महामेळाव्यामध्ये नामांकित 52 कंपन्यांचा सहभाग होता. पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे 690 युवक-युवतींनी या महामेळाव्यात सहभाग घेतला  तर त्यातील पात्र असलेल्या 273 जणांना त्याच दिवशी थेट नामांकित कंपन्यांची शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे सुपूर्द करण्यात आली. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव पाटील, व्हा. चेअरमन पांडूरंग नलवडे, विजय पवार, विजय शिंदे, विजय जंबुरे, सुरेश पानस्कर, संतोष गिरी, विलास कुराडे, प्रकाशराव जाधव, जालिंदर पाटील, शशिकांत निकम, विजय सरगडे, शिवाजीराव शेवाळे, आप्पा मगरे यांचेसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि मतदारसंघातील युवक-युवती व पुणे, सातारा, कोल्हापूर येथील अनेक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून प्रतिवर्षी उपलब्ध होणार नोकऱ्यांची संधी
नोकरी महामेळाव्याला मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवती यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या रोजगार मेळाव्यातून शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र झालेल्या उमेदवारांना जागेवरच नेमणूक पत्र मिळाल्याने अशा प्रकारच्या नोकरी मेळाव्याचे प्रतीवर्षी आयोजन करण्याची उपस्थितीत राहिलेल्या युवक- युवतींनी केलेल्या मागणीला व मिळालेला प्रतिसादाला साद देत पालमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिवर्षी अशा प्रकारचा नोकरी महामेळावा आयोजित करणार असल्याचे जाहिर केले.