राणेंविरोधात शिवसेना आक्रमक; क्रांती चौकात मुर्गी छोडो आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोकणामधील जन आशीर्वाद यात्रेनिमित्त पत्रकारांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रातील शिवसेना आक्रमक झाली आहे.

आज सकाळी साडेदहा वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक येथे मुर्गी छोडो व जोडे मारो आंदोलन शिवसैनिकांकडून करण्यात आले केंद्रीय मंत्री नारायण राणे मुर्गी चोर नारायण राणे मुर्दाबाद अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या नारायण राणे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून चपला मारण्यात आल्या

क्रांती चौक पोलीस ठाणे येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधामध्ये आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment