औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला नीती आयोगाचे सीईओ यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैर यांनी विकास कामांबद्दल त्यांच्यासोबत अर्धातास चर्चा केली.
या चर्चेत त्यांनी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद येथे केंद्र सरकार पुरस्कृत केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र (CGHS) सुरू करा, राष्ट्रीय महामार्ग ५२ ( २११ ) अंतर्गत कन्नड-चाळीसगाव घाटातील बोगदा, औरंगाबाद चाळीसगाव रेल्वे मार्ग, जिल्ह्यातील पर्यटन हब आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
राष्ट्रीय महामार्ग ५२ ( २११ ) अंतर्गत औट्रम घाटातील बोगद्याला ६ हजार कोटीचा खर्च असून हा बोगदा खांन्देश, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे या बोगद्याचे महत्व लक्षात घेता आपण या कामी व्यक्तीगत लक्ष द्यावे अशी विनंती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. यावेळी नीती आयोगाच्या माध्यमातून सर्वोत्तोपरी मदत करण्याचे आश्वासन नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना दिले.